indian navy diwali Dainik Gomantak
गोवा

PM Modi Celebrates Diwali: "INS विक्रांतने पाकिस्तानची झोप उडवली", PM मोदींची दिवाळी गोव्यात; नौदलासोबत साजरा केला जल्लोष

PM Modi diwali celebration Goa: गोवा आणि कारवारच्या किनाऱ्याजवळ समुद्रात असताना, त्यांनी शेकडो शूर नौदल जवानांना संबोधित केले

Akshata Chhatre

गोवा/कारवार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली वार्षिक परंपरा कायम ठेवत सोमवारी (२० ऑक्टोबर २०२५) आयएनएस विक्रांत (INS Vikrant) या युद्धनौकेवर नौदल कर्मचाऱ्यांसोबत दीपावलीचा सण साजरा केला. गोवा आणि कारवार (कर्नाटक) च्या किनाऱ्याजवळ समुद्रात असताना, त्यांनी शेकडो शूर नौदल जवानांना संबोधित केले आणि त्यांच्यासोबत हा पवित्र सण साजरा करण्याचे भाग्य मिळाल्याचे सांगितले.

'विक्रांत'ने पाकिस्तानला निद्रानाश दिला

पंतप्रधानांनी यावेळी 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत सुरक्षा दलांच्या शौर्याचा गौरव केला. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून ७ मे रोजी सुरू केलेल्या या ऑपरेशनबद्दल ते म्हणाले, "विक्रांतने संपूर्ण पाकिस्तानला निद्रानाश केला." त्यांनी स्पष्ट केले की, नौदलाने निर्माण केलेली 'भीती', हवाई दलाने दाखवलेले 'असाधारण कौशल्य' आणि लष्कराच्या 'शौर्यामुळे' तसेच तिन्ही सेवांमधील 'अपवादात्मक समन्वय' मुळेच 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानला काही दिवसांतच गुडघे टेकावे लागले.

आत्मनिर्भरतेचे प्रतीक

आयएनएस विक्रांत ही केवळ युद्धनौका नाही, तर २१ व्या शतकातील भारताची कठोर मेहनत, प्रतिभा आणि वचनबद्धतेचा एक पुरावा आहे. हे आत्मनिर्भर भारताचे एक प्रतीक आहे, असे मोदी म्हणाले.

जवानांमधील उत्साह अविस्मरणीय

जवानांसोबत घालवलेल्या क्षणांबद्दल बोलताना पंतप्रधान भावूक झाले. " आयएनएस विक्रांतवर घालवलेला वेळ शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. तुमच्यात भरलेला प्रचंड उत्साह आणि ऊर्जा मी पाहिली," असे ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूर' दरम्यान ब्रह्मोस आणि आकाश या क्षेपणास्त्रांनी आपली क्षमता सिद्ध केली असून, अनेक देश ती खरेदी करण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी नंतर 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले. "लोक आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करायला आवडतात. आणि मलाही, म्हणूनच मी दरवर्षी आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्य आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना भेटतो. INS विक्रांतला फ्लॅगशिप म्हणून घेऊन पश्चिम किनारपट्टीवर नौदल कर्मचाऱ्यांमध्ये राहून आनंद झाला," असे त्यांनी लिहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शनि आणि गुरुची चाल करणार मालामाल! नव्या वर्षात खुले होणार उत्पन्नाचे नवे मार्ग, 2026 मध्ये 'या' राशींना मिळणार धनकमाईच्या सुवर्णसंधी

Bodgeshwar Jatra: म्हापशात प्रशासनाचा बडगा! श्री बोडगेश्वर जत्रोत्सवातील जायंट व्हील्ससह 20 राईड्स सील; सुरक्षेच्या कारणास्तव मोठी कारवाई

पिढ्यांमधील अंतर आणि मनाचा समतोल: सुखी म्हातारपणाची गुरुकिल्ली

लग्नाच्या मांडवात राडा! नवऱ्या मुलाला किस करणाऱ्या 'एक्स'ला नवरीनं भर मंडपात धोपटलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

India Pakistan Nuclear List: तणावाच्या वातावरणातही भारत-पाकिस्तानने जपली 35 वर्षांची परंपरा; अणुयादीच्या देवाणघेवाणीने जगाचे वेधले लक्ष

SCROLL FOR NEXT