Water Issues Dainik Gomantak
गोवा

Chicalim News: चिखलीत पाईपलाईन फुटल्याने ग्रामस्थांचे हाल, पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा

चिखली पंचायती जवळ कामगारांच्या निष्काळजीपणामुळे पाण्याची पाईपलाईन फुटल्याने शेकडो लिटर पाण्याची नासाडी झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

अदानीच्या गॅस पाईपलाईन घालण्याच्या कामावेळी चिखली पंचायती जवळ कामगारांच्या निष्काळजीपणामुळे पाण्याची पाईपलाईन फुटल्याने शेकडो लिटर पाण्याची नासाडी झाली. तसेच फुटलेली पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती शिवाय ठेवल्याने चिखलीच्या लोकांचे गेले तीन दिवस पाण्याविना हाल झाले आहेत. पाणीपुरवठा तातडीने सुरळीत न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा चिखलीवासीयांनी दिला आहे.

अदानी कंपनीतर्फे वास्को शहराबरोबर संपूर्ण मुरगाव तालुक्यात गॅस पाईपलाईन घालण्याचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे.

या दरम्यान अदानी कंपनी कडून रस्त्याचे खोद काम करण्याचे काम चालूच आहे. सधा रस्त्यांचे हॉटमिसिंग करण्याचे काम चालू आहे. तेही रस्ते खोदण्यास कंपनी मागे पुढे पाहत नाही.

Water Issues

त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. कित्येक वेळा कंपनी कंत्रारदाराची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण कोणताच फायदा झाला नाही. तसेच खोदकाम काम करताना वीज वाहिन्या तोडण्याचे काम तसेच पाण्याची पाईपलाईन फोडण्याचेही प्रकार कित्येक वेळा कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टर कामगाराकडून घडले आहे.

दरम्यान अदानी कंपनीकडून हीच पुनरावृत्ती तीन दिवसांपूर्वी चिखली येथे घडली. गॅस पाईपलाईनसाठी खोदकाम करून कंत्राटदार तसेच कामगारांच्या निष्काळजीपणामुळे चिखली पंचायत मैदाना जवळ पाण्याची मेन पाईपलाईन फोडल्याने शेकडो लिटर पाण्याची नाशाडी झाली आहे.

तसेच फुटलेल्या पाईपलाईनची गेले तीन दिवस दुरूस्ती न झाल्याने चिखली वासीयांचे नळ तीन दिवस कोरडे राहाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाल्याने चिखलीवासियांचे पाण्याविना हाल झाले आहे.

आज या रहीवाशांनी चिखली पंचायत जवळ कामच्या ठीकाणी जमून कंञाटदाराला बरेच धारेवर धरले. यावेळी स्थानिक पंच सदस्यही उपस्थित होते. अदानी कामगारांकडून मोठा खड्डा मारुन हॉटमिक्स केलेला रस्ता खोदून टाकला.

तसेच माती मुख्य रस्त्यावर टाकल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मैदानावरही खोदकाम करून मैदानाची दुर्दशा केल्याने रहीवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT