मोरजी मैदान  Dainik Gomantak
गोवा

मोरजी मैदानाची दुर्दशा; दुरुस्ती रखडली

क्रीडा खात्याची अनास्था: निविदा रक्कम वाढवूनही कंत्राटदारच मिळेना

दैनिक गोमन्तक

पेडणे: मोरजी क्रीडा मैदानाच्या दुरुस्तीसाठी 97 लाखांची निविदा कंत्राटदार न मिळाल्याने दुसऱ्यांदा एक कोटी 13 लाखांची निविदा जारी करूनही काम करण्यास कंत्राटदार येत नसल्याने या मैदानाची दुरुस्तीअभावी दिवसेंदिवस दुर्दशा होत आहे. नवे क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी यात लक्ष घालून हे मैदान पुनर्जीवित करावे, अशी मागणी क्रीडाप्रेमींकडून होत आहे.

याविषयी क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांच्याकडे संपर्क साधला असता आपण गावागावांतील क्रीडा मैदानांकडे लक्ष देऊन योग्य सुविधा पुरवण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. आपल्याकडे प्रथमच क्रीडा खाते आल्याने जसा आपण कला आणि संस्कृती खात्याला न्याय दिला आहे, तसाच क्रीडा खात्याच्या माध्यमातून क्रीडाप्रेमींना द्यावा,यासाठी आपण प्रयत्न करणार आहे.

मोरजीत क्रीडा मैदान व्हावे यासाठी माजी शिक्षणमंत्री संगीता परब , माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप,माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर तत्कालीन सरपंच रत्नाकांत शेटगावकर, रत्नाकर शेटगावकर, सतीश शेटगावकर, वैशाली शेटगावकर, माया पोके, वृषाली आजगावकर यांनी जोरदार प्रयत्न केले होते.परंतु या मैदानाकडे क्रीडा खात्याच्या दुर्लक्षामुळे मैदानावरील हिरवळही करपून गेली आहे.

मैदानालगतची विहिरीला शापोरा नदीला येणाऱ्या भरतीच्या वेळी खारे पाणी विहिरीत येते, परिणामी या पाण्याचे सिंचन हिरवळीवर केल्यामुळे हिरवळ मरून जाते, सरकारने नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज आहे,असे येथील क्रीडाप्रेमींनी सांगितले.

सध्या पेडणे तालुक्यात मोरजी , मांद्रे , कोरगाव , चोपडे ,वारखंड पेडणे , तुये या ठिकाणी क्रीडा मैदाने आहेत. पेडणे सावळ वाडा येथील मैदानाची पुनर्बांधणी ३२ कोटी रुपये खर्च करून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी करण्यात आली आहे. त्यावेळी तत्कालीन क्रीडा मंत्र्यांचे लक्ष केवळ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांकडे होते. त्यामुळे कोणत्या गावात कोणते मैदान आहे व त्याची स्थिती काय आहे, याची माहिती त्यांनी जाणून घेतली नाही,असा आरोप क्रीडा प्रेमींकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT