Plastic Free Goa Campaign Dainik Gomantak
गोवा

Plastic Free Goa: मासे खरेदीसाठी दिली स्टील भांडी; चांदेल पंचायतीचा उपक्रम

चांदेल पंचायतीचा उपक्रम; प्लास्टिक रोखण्याचा उत्तम उपाय ः आर्लेकर

दैनिक गोमन्तक

Plastic Free Goa Campaign: चांदेल पंचायत क्षेत्र प्लास्टिक मुक्त करण्याच्या उद्देशाने प्लास्टिक पिशव्यांतून मासे विकत न घेता ते स्टीलच्या भांडयांतून घ्यावेत,यासाठी स्टील भांडी देण्याचा सरपंच तुळशीदास गावस व पंचायत मंडळाने घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद असून सर्वांनी पंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार प्रवीण आर्लेकर यांनी चांदेल येथे केले. ते भांडी वितरणाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

सरपंच तुळशीदास गावस, उपसरपंच रुचिरा मळीक , पंचायत सदस्य बाळा शेटकर, पंच रिमा मळीक यावेळी उपस्थित होते. आज सर्वत्र प्लास्टिकमुळे प्रदूषण होत आहे.प्लास्टिक मातीत कुजत नसल्याने प्राणिमात्रावर होतो. गाई-गुरे पिशव्या खातात, त्यांच्याही आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि गावातील प्लास्टिक मुक्त करण्यासाठी चांदेल पंचायतीने एक चांगले पाऊल टाकले आहे, असेही आर्लेकर म्हणाले.

ग्रामस्थांनी खास करून महिलांनी मासे विकत घेताना प्लास्टिक पिशवीऐवजी पंचायतीने दिलेल्या स्टीलच्या भांड्यांतून घ्यावेत. जेणेकरून प्लास्टिक पिशव्या आपल्या परिसरात तसेच घरात येणार नाही. या उपक्रमामुळे चांदेल-हसापूर गाव निश्‍चितच प्लास्टिक मुक्ती कडे जाईल, असे आमदार आर्लेकर म्हणाले.

चांदेल -हसापूर पंचायतीचे सरपंच तुळशीदास गावस यांनी प्लास्टिक मुक्तीचा नारा देत गावात प्रदूषण होऊ नये तसेच प्लास्टिकचा कचरा साठू नये यासाठी आगळावेगळा उपक्रम हाती घेतलेला आहे,असे आमदार आर्लेकर म्हणाले. यावेळी पंच प्रजय मळीक यांनी आभार मानले.

‘पीओपी’मूर्ती सीमेवरच रोखू !

गणेश चतुर्थीचा सण जवळ आलेला आहे. गोव्याच्या विविध भागात ‘पीओपी’च्या मूर्ती काही चित्रशाळांत आम्हाला पाहायला मिळतात. मात्र, यापुढे सरकार त्याच्यावर कठोर पावले उचलणार असून यापुढे पुढच्या वर्षापासून या गणेश मूर्ती गोव्याच्या हद्दीत येण्यासाठी त्यांना सीमेवरच रोखण्यात येईल. भाविकांनी चिकण मातीच्याच गणेश मूर्ती आपल्या घरी पूजन करावे. जेणेकरून या गणेश मूर्तींची विटंबना होणार नाही,असे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: सत्तारीतील भुईपाल येथे अपहरणाचा प्रयत्न

Goa Politics: '60 वर्षे गोव्यावर ठराविक कुटुंबांचीच पकड! फॅमिलीराज संपवणे गरजेचे'; केजरीवालांनी घेतले भाजप, काँग्रेसवर तोंडसुख

Goa Politics: खरी कुजबुज; तरीही केजरीवालांचे ‘एकला चलो’ का?

Goa: RSSच्या विजयादशमीला मोन्‍सेरात उपस्‍थित! 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केले अभिनंदन; उत्पल पर्रीकरांची गणवेशात उपस्‍थिती

Bhuipal: रात्री येत होता घरी, जबरदस्ती गाडीत बसवण्याचा केला प्रयत्न; 12 वर्षीय मुलाच्या प्रसंगावधानामुळे अपहरणाचा डाव फसला

SCROLL FOR NEXT