Plantation Dainik Gomantak
गोवा

Plantation Campaign : धवरुख संस्थेने मांद्रे येथे राबविली वृक्षारोपण मोहीम

Plantation Campaign : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपक्रम

गोमन्तक डिजिटल टीम

Plantation Campaign :

मोरजी, पर्यावरणाचे संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी धवरूख संस्थेने बुधवारी पर्यावरणदिनी वृक्षारोपण केले. या उपक्रमात विद्याप्रबोधिनी कॉलेज ऑफ कॉमर्स, एज्युकेशन कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट, खलप हायस्कूल-मांद्रे, सप्तेश्वर इन्स्टिट्यूट फॉर हायर सेकंडरी आणि गोवा वन विभाग यांचा सहभाग होता.

यावेळी ४०० स्थानिक वृक्षांची रोपे लावण्यात आली. या रोपवाटिकेमुळे येथील मोसमी वृक्षारोपण हंगामाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात सन्माननीय सतीश शेटगावकर, जिल्हा परिषद सदस्य मांद्रे, सीताराम आश्वेकर, सप्तेश्वर हायर सेकंडरीचे प्राचार्य, वन विभागाचे शिवानंद गावस, तसेच शाळांचे कर्मचारी आणि स्वयंसेवक उपस्थित होते.

या मोहिमेत खलप हायस्कूलमधून ४७ आणि सप्तेश्वर हायसेकंडरीमधून २० विद्यार्थी स्वयंसेवक सहभागी झाले. याशिवाय शिक्षकवर्ग आणि गावातील लोकांनीही आनंदाने या उपक्रमात सहभाग घेतला.

२७ हजारांहून अधिक वृक्षांचे जतन

साहाय्यक प्राध्यापक तथा संस्थेचे अध्यक्ष रुद्रेश म्हामल यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. सतीश शेटगावकर यांनी धवरुख संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली. सीताराम आश्वेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. २०१७ मध्ये स्थापन झाल्यापासून धवरुख संस्थेने आतापर्यंत २७ हजारांहून अधिक झाडे लावली आहेत. तीव्र उन्हाळ्यातही त्यांची काळजी घेण्याचे काम संस्था करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात वंदे-मातरमची मुले उपाशी...

Ranji Trophy 2025: अर्जुन तेंडुलकर, कौशिकचा भेदक मारा! पाहुणा संघ बॅकफूटवर; ललित यादवने टिपले 2 बळी

Stray Dogs: पर्यटकांवर हल्ला, वाढती संख्या; गोव्यात 'भटक्या कुत्र्यांच्या' समस्येबाबत होणार चर्चा, मुख्‍य सचिव घेणार अधिकाऱ्यांची बैठक

Pooja Naik: 'पूजा'कडून पैसे घेणारे मंत्री, IAS अधिकारी, अभियंता कोण? ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरण पेटणार; मुख्‍यमंत्र्यांनी दिली तपासाची हमी

Tragic Death: कार कोसळली कालव्यात, युवक गेला वाहून; अस्नोडा येथे दुर्दैवी घटनेत एकाचा मृत्यू Watch Video

SCROLL FOR NEXT