Where is the Money Dainik Gomantak
गोवा

योजना अनेक, पैसा कुठे?

राष्ट्रीय स्पर्धा घेण्यासाठी मला केवळ 45दिवसांचा अवधी द्या.’ हा अवधी आणि आणखी 45 कोटी रुपये त्यांना दिले की ते पायाभूत सुविधा तयार करू शकतील : क्रीडामंत्री गोविंद गावडे

दैनिक गोमन्तक

गोवा : दिल्लीच्या सरकारातील उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दोन दिवसांपूर्वी पाच किलोमीटरच्या सबवेचे उद्‌घाटन केले. ज्या पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करून हा सबवे उभारण्यात आला आहे, ते काम नेत्रदीपकच आहे. गुडगांव ते चाणक्यपुरी या मार्गावरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून हे काम सरकारने तातडीने उभे केले. दुसऱ्या बाजूला गोव्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे म्हणताहेत, ‘राष्ट्रीय स्पर्धा घेण्यासाठी मला केवळ 45दिवसांचा अवधी द्या.’ हा अवधी आणि आणखी 45 कोटी रुपये त्यांना दिले की ते पायाभूत सुविधा तयार करू शकतील.

राज्य सरकारकडे निधी कुठे आहे? राज्यातील कित्येक स्टेडियम उभे करून झाले, त्यांच्या देखभालीवर करोडो रुपये खर्च होत आहेत. त्यालाच येथे विकास म्हणतात की काय, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडतो. धारगळ येथे आयुष इस्पितळ उभे झाले आहे. हे इस्पितळ केंद्राच्या निधीतून बांधले, असे जरी सांगण्यात येत असले तरी त्यासाठीचा 40 टक्के खर्च राज्याने केला आहे. म्हणजे किमान अडीचशे कोटींचा भुर्दंड राज्य सरकारला बसला असण्याची शक्यता आहे. तेथे युनानी आयुर्वेदिक होमिओपॅथी आदी उपचारपद्धतींचा अवलंब होणार असला, तरी किती गोवेकरांना ॲलोपथी सोडून तेथे स्वत:वर प्रयोग करून घ्यायला आवडेल, असा प्रश्‍न सध्या मोठ्या चवीने चर्चेला येत आहे. मडगावमध्ये मोठ्या उत्साहाने जिल्हाधिकारी संकुल उभारण्यात आले. त्याची देखभाल व्यवस्थित केली जातेय का? ∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांना जनतेचा वेढा

VIDEO: 6 षटकार, 5 चौकार अन् 71 धावांची वादळी खेळी! युवराज सिंहने दाखवला जुन्या 'युवी'चा अंदाज, ऑस्ट्रेलियाला धू धू धुतलं

Goa Politics: 2012 मध्ये 8 भंडारी आमदार, आता मुख्यमंत्रिपदाची प्रतीक्षा; 2027 मध्ये समाजाचे राजकीय समीकरण काय?

Horoscope: 4 ऑक्टोबरचा दिवस ठरणार खास! 'या' राशींचं नशीब उजळणार; नोकरी-व्यवसायात मोठा फायदा, प्रेमजीवनही होईल सुखकर

God In Difficult Times: सुखात देवाचा विसर, दुःखात आर्त हाक; संकटांच्या काळातच का अधिक घट्ट होतं भगवंताशी नातं?

SCROLL FOR NEXT