IRCTC Goa Tour Package: Dainik Gomantak
गोवा

IRCTC Goa Tour Package: गोव्याला फिरायला येताय? मग रेल्वेच्या या टूर पॅकेजचा घ्या लाभ; जाणून घ्या डिटेल्स

6 ऑक्टोबरपासून होणार प्रारंभ

Akshay Nirmale

IRCTC Goa Tour Package: गोवा हे देशविदेशातील पर्यटकांचे एक महत्वाचे पर्यटन डेस्टिनेशन आहे. देशातील विविध भागातून पर्यटक गोव्यात येत असतात. त्यासाठी विविध टूर-टॅव्हल्स कंपन्या विविध पॅकेजिसदेखील देत असतात.

रेल्वेची IRCTC कंपनी देखील विविध भागातील पर्यटनासाठी विविध पॅकेजिस देत असते. असेच एक अनोखे पॅकेज आता IRCTC गोव्यासाठीदेखील आणले आहे.

गोव्यातील पर्यटन हंगामात 1 ऑक्टोबरपासून सुरवात होत असते. त्यानंतर लगेचच म्हणजे 6 ऑक्टोबरपासून IRCTC च्या या टूर पॅकेजला प्रारंभ होणार आहे. IRCTC ने 'देखो अपना देश' अंतर्गत हे टूर पॅकेज सुरू केले आहे. हे टूर पॅकेज लखनौपासून सुरू होणार आहे.

IRCTC च्या अनेक टूर पॅकेजेसच्या माध्यमातून प्रवासी स्वस्तात प्रवास करतात आणि त्यांना अनेक सुविधाही मिळतात. IRCTC प्रवाशांना ट्रेन आणि विमानाने प्रवास करण्याची सुविधा देते. IRCTC च्या या टूर पॅकेजबद्दल सविस्तर माहिती घेऊ.

IRCTC चे हे गोवा गोवा टूर पॅकेज 4 दिवसांचे आहे. या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना 3 रात्री आणि 4 दिवस गोव्यात एन्जॉय करता येईल. यात पर्यटकांना गोव्यताील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेट देता येईल.

या टूर पॅकेजची किंमत 30,800 रुपयांपासून सुरू होत आहे. यामध्ये रेल्वेकडून पर्यटकांसाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे.

पॅकेजचे भाडे

गोव्याच्या या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला प्रतीव्यक्ती शुल्क द्यावे लागेल. हे प्रति व्यक्ती भाडे 30 हजार 800 रुपये इतके आहे. जर तुम्ही या टूर पॅकेजमध्ये 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला बेडच्या भाड्यासह प्रति व्यक्ती 27 हजार 350 रुपये मोजावे लागतील.

त्याच वेळी, 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी बेडशिवाय भाडे 26 हजार 950 रुपये आहे. तर 2 ते 4 वर्षे वयोगटातील मुलांचे भाडे 26 हजार 950 रुपये असेल. हे टूर पॅकेज बुक करण्यासाठी पर्यटक IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Birthday: "मोदीजी दूरदर्शी नेते" मुख्यमंत्र्यांनी केले खास ट्विट; 75व्या वाढदिवसानिमित्त गोव्यातून शुभेच्छांचा वर्षाव

Mhadei Tiger Reserve: म्हादईत व्याघ्र प्रकल्प होणार का? CEC येणार गोव्यात; गोवा फाउंडेशन-वन अधिकाऱ्यांत खडाजंगी

Goa Live Updates: तिस्क-उसगाव येथे कार व बुलेट यांच्यात अपघात

Goa Politics: खरी कुजबुज; रवी पात्रावचे बॅनर्स फाडण्याचा ‘प्रताप’

Goa: 'घर खरेदी गोमंतकीयांच्या आवाक्याबाहेर, दर 666% वाढले', राहुल देशपांडेंचे प्रतिपादन; ‘स्वयंपोषक विकास व गोवा’ सादरीकरण

SCROLL FOR NEXT