लग्नासाठी गोवा डेस्टिनेशन?
गोवा हे एक अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी भारत आणि परदेशातील हजारो पर्यटक गोव्यात येतात. वर्षाच्या शेवटी, तर गोव्यात पर्यटकांची झुंबड असते. दूर-दूरच्या ठिकाणांहून-कुटुंबासोबत लोक ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात येतात. गेल्या काही वर्षांत गोवा हे वेडिंग डेस्टिनेशन बनले आहे. सुंदर समुद्रकिनारे, हेरिटेज स्ट्रक्चर्स, स्वादिष्ट भोजन आणि थंडगार वातावरण यामुळे गेल्या काही वर्षांत लग्न स्थळासाठी लोकांची गोव्याला पसंती असते.
बदलते समाजजीवन -
पूर्वीच्याकाळी नववधूसाठी घरी हाताने शिवून गाऊन तयार केला जात असे. वधूच्या पुष्पगुच्छाची फॅशन करण्यासाठी तसेच कॅथोलिक विवाहसोहळ्यांमध्ये लग्नाची गाडी सजवण्यासाठी स्थानिक घराच्या बागांमधून काढलेले गुलाब व शोभेच्या वस्तू वापरल्या जात होत्या. त्याकाळी लग्नाचे हॉलहि संकल्पना अस्तित्वातच नव्हती.
लग्न घरीच रिसेप्शन वगैरे गोष्टी आयोजित केल्या जात होत्या, तर लग्नाचे खानपान (वधू/वरांच्या घरी) गावात केले जात असे. परंतु आजकाल गोव्यात लग्न मोठ्या प्रमाणात होतात, त्यामुळे या सर्व गोष्टी रेडिमेड घेण्याकडे लोकांचा काळ आहे आणि म्हणूनच आम्ही गोव्यातील अशी काही ठिकाणं सांगत आहोत जिथे तुम्हाला लग्न सराई साठी आवश्यक त्या सर्व गोष्टी मिळतील.
गिल्टर बॉक्स-
स्पेशलिस्ट्स: वेडिंग ऍक्सेसरीज (कृत्रिम फुलांचा पुष्पगुच्छ, रिंग होल्डर, शॅम्पेन ग्लासेस, फोटो चार्म्स, ब्यूटोनियर्स, हेअर अॅक्सेसरीज, हँडहेल्ड/मनगटाचे सामान), गिफ्ट हॅम्पर्स, इव्हेंट स्टाइलिंग.
संस्थापक: मिनालिझ चिको
स्थळ: तळेगाव, उत्तर गोवा
संपर्क: +91 96890 81715
वेडिंग ब्लेस-
स्पेशलिस्ट्स: वधूचे सामान, हाताने बनवलेले ईअर रिंग, हाताने बनवलेल्या क्लिप, ख्रिसमस डेकोर, पुष्पगुच्छ, रिंग होल्डर आणि इतर हस्तकला वस्तू
संस्थापक: फियोना फर्नांडिस
स्थळ: मडगांव
संपर्क: +91 91681 72720
लिटल फ्लावर-
स्पेशलिस्ट्स: वधूचे पुष्पगुच्छ (नैसर्गिक आणि कृत्रिम), कस्टम रिंग-होल्डर, हेड गियर, टेबलचे तुकडे इ.
संस्थापक: जेनेसा डिसोझा
स्थळ: जुने गोवा, उत्तर गोवा
संपर्क: +91 78752 38531
व्हर्जिनिया क्रिअशन-
स्पेशलिस्ट्स: वधूचे पुष्पगुच्छ (विशेषतः कॅस्केडिंग लिली), रिंग होल्डर, सर्व वधूचे सामान
संस्थापक: व्हर्जिनिया डिक्रूझ
स्थळ: साळीगाव, उत्तर गोवा
संपर्क: +91 96233 47245
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.