Piyush Goyal Gomantak Digital Team
गोवा

Piyush Goyal : गोव्याच्या पर्यटन वाढीसाठी केंद्र सरकार देणार या संकल्‍पनेला प्रोत्साहन ...

पणजी येथे आयोजित उद्योग संवाद कार्यक्रमात यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व उद्योजक उपस्‍थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी गोवा आणि केंद्रीय मंत्रालयाच्या कार्यगटाचा प्रस्ताव तयार केला जाईल, अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज दिली. पणजी येथे आयोजित उद्योग संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व उद्योजक उपस्‍थित होते.

गोयल म्हणाले, गोवा माझ्यासह सर्वांचे आवडते ठिकाण आहे. गोव्यातील पर्यटन वृद्धीसाठी यापुढेही प्रयत्न होणे आवश्यक असून, केंद्र सरकार यासाठी आवश्यक पावले उचलेल. आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त कार्य गट स्थापन करून त्यामार्फत विविध योजनांना चालना देण्यात येईल. मोपा विमानतळ आणि राज्याच्या पर्यटन वाढीला प्रोत्साहन दिले आहे.

मनोरंजन क्षेत्रातील भागधारकांना गोव्यात आणण्यासाठी काय आवश्यक आहे, ते पाहावे. ‘होम स्टे’ संकल्‍पनेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने धोरण आणावे, असेही त्यांनी सुचवले. केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आधुनिक भारत घडवण्यासाठी विविध क्षेत्रात गतिशील काम सुरू आहे. देशाला विकसित करण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रातील आव्हाने स्वीकारली आहेत.

कृतज्ञ भावनेने काम

पंतप्रधान मोदी निवडणुकानंतर सर्व स्तरावरचा भेदभाव विसरून विकासाच्या संकल्पना मांडतात आणि त्या साकारण्यासाठी प्रयत्न करतात हा अनुभव आहे. डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजना राबवण्यात जी सहजता मिळते, ती दुसऱ्या पक्षाचे सरकार असल्यास संबंधित पक्षांकडून योग्य ते सहकार्य मिळत नाही, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT