Pissurlem mining pit Dainik Gomantak
गोवा

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Pissurlem mining pit: पिसुर्ले येथील खाण खंदकातील पाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. खंदकातील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्यास पाणी खेचण्यासाठी येथे पंप बसविण्यात आले आहेत.

Sameer Panditrao

पिसुर्ले: पिसुर्ले येथील खाण खंदकातील पाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. खंदकातील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्यास पाणी खेचण्यासाठी येथे पंप बसविण्यात आले आहेत. यामुळे कोणत्या प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. जलस्रोत विभागाचे अधिकारी स्थितीवर नजर ठेवून आहेत. गरज पडल्यास पंप सुरू करण्यात येईल, अशी माहिती जलस्रोत विभागातील सूत्रांनी दिली.

या ठिकाणी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पंप बसविण्यात आलेले आहेत. पिसुर्लेतील या खाण खंदकात मोठ्या प्रमाणात पाणी भरले असून खंदक ओव्हरफ्लो झाल्यास आसपासच्या लोकवस्तीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मागील काही वर्षांपासून या खंदकावर पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप बसविण्यात येतात. पावसाळ्यात पाण्याचा साठा वाढल्यास हे पंप सुरू करण्यात येतात. यंदाही हे पंप बसविण्यात आले आहेत.

सध्या जलसिंचन विभागाची यंत्रणा येथे लक्ष ठेऊन असून दर दिवशी पाण्याची पातळी मोजण्यात येत आहे. धोकादायक स्थिती निर्माण झाल्यास पंप सुरू करून पाण्याचा निचरा नजीकच्या ओहोळात करण्यात येणार आहे.

जलशुद्धीकरण प्रकल्प हवा

दरम्यान, या खाणीतील पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पात वळविल्यास या परिसरातील नागरिकांना याचा फायदा होऊन शेती, बागायती पुन्हा बहरू लागतील. यात पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

यंत्रणेने दक्ष राहणे आवश्‍यक, सरपंच देवानंद परब

याबाबत सरपंच देवानंद परब यांनी सांगितले की, या खंदकामध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा होतो. हा खंदक मोठा असून क्षमतेपेक्षा जास्त पाणी भरल्यास खालच्या बाजूला असलेल्या घरे, शेती आदींना धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे जलसिंचन खाते गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी पंप बसून पाण्याचा निचरा करण्यावर भर देते. यंदाही पंप बसविण्यात आलेले आहेत. मात्र याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. कारण यापूर्वी पाणी लोकवस्ती घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

Goa News Live Updates: पर्ये सुरी हल्ला प्रकरण; आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

Best 5G Smartphones: 30 ते 40 हजारांमध्ये मिळवा टॉप ब्रँड्सचे 'हे' 5G स्मार्टफोन, फीचर्स अन् सर्व डिटेल्स वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT