Jaipur - Goa Flight Dainik Gomantak
गोवा

Jaipur - Goa Flight: पर्यटकांसाठी खूशखबर! गुलाबी शहरातून गोव्यासाठी सुरु होणार आणखी एक फ्लाईट

Jaipur - Goa Flight: नवीन उड्डाण सुरू झाल्यामुळे पर्यटकांना प्रवासाचे अधिक पर्याय उपलब्ध होतील, ज्यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाची सोय अधिक सुलभ होणार आहे.

Pramod Yadav

Jaipur - Goa Flight

गुलाबी शहर जयपूर ते गोवा विमानसेवेत आणखी एका फ्लाईटची वाढ करण्यात आली आहे. यामुळे जयपूर येथून गोव्याला नियमित दोन उड्डाणे सुरू होणार आहेत. आजपासूनच (16 नोव्हेंबर) या सेवेचा शुभारंभ होत आहे.

या विमानसेवेचा प्रवाशांना अधिक लाभ होणार आहे. यापूर्वी जयपूर ते गोव्यासाठी एकच विमानसेवा सुरू होती. मात्र आता विमान कंपनीने नवीन उड्डाणे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन फ्लाइट (6E-6429) जयपूरहून गोव्यासाठी रात्री 8.15 वाजता उड्डाण करेल. तर फ्लाइट 6E-6428 दुपारी 1:10 वाजता गोव्याहून जयपूरला परतेल.

नव्याने सुरु झालेले विमान दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळावरुन कार्यरत असले, तर आधीच सुरू असलेले विमान मोपा विमानतळावरून कार्यरत असेल.

गोवा हे एक प्रमुख पर्यटन स्थळ असून, नुकतेच राज्यात पर्यटन हंगाम सुरु झाला आहे. जयपूर मधून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. नवीन उड्डाण सुरू झाल्यामुळे पर्यटकांना प्रवासाचे अधिक पर्याय उपलब्ध होतील, ज्यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाची सोय अधिक सुलभ होणार आहे.

जयपूर विमानतळावरून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना आता अधिक लाभ मिळणार असून ते अधिक आरामदायी प्रवास करू शकतील.

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन नवीन उड्डाण सेवा सुरू करण्यात आली असून जयपूर-गोवा मार्गावरील वाहतूक वाढण्याची अपेक्षा आहे, असे एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: 'कॅश फॉर जॉब प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची गरज नाही'; वाचा ठळक बातम्या

Cash For Job Scam: दोन सरकारी कर्मचाऱ्यांसह 33 जणांना अटक; राजकीय कनेक्शनबाबत गोवा पोलिसांनी केला महत्वाचा खुलासा

Goa Crime: चोरीची तक्रार केली म्हणून रेस्टॉरंट मालकाचा काढला काटा; सहा वर्षानंतर दोघांना जन्मठेप, 1 लाख दंड

Cash For Job प्रकरणात सत्तरीतील युवकाला अटक! डिचोलीतील पाचजणांकडून उकळले 21.5 लाख

Cash For Job Scam: बाबूशचा संताप

SCROLL FOR NEXT