Pineapple Farming 
गोवा

Pineapple Farming: राज्यातील शेतकऱ्यांना लागतेय अननसाची गोडी, 'जायंट कीव'सह इतर प्रकारांची लागवड; उत्पादनाला मोठा वाव

Goa Agriculture: राज्यात अननसाची लागवड सुरू झाली आहे. कुंकळये (मंगेशी), सावईवेरे, रिवण, केपे, सांगेसारख्या भागात अननसाचे घेतले जाते.

Sameer Amunekar

सासष्टी: राज्यात अननसाची लागवड सुरू झाली आहे. कुंकळये (मंगेशी), सावईवेरे, रिवण, केपे, सांगेसारख्या भागात अननसाचे घेतले जाते व आता हे पीक गोव्यातील इतर भागातील शेतकऱ्यांमध्ये रुची निर्माण करत आहे.

एका आकडेवारीप्रमाणे गोव्यात दरवर्षी ३३६ हेक्टर जमिनीत ५०४० टन अननसाचे उत्पादन घेतले जाते. अननसाचे तीन प्रकार जास्त प्रचलित आहेत. त्यात जायंट कीव, क्वीन व रेड स्पॅनिश या प्रकारांचा समावेश आहे. या तिन्ही प्रकारांची लागवड गोव्यात होते, हे गोव्याचे भाग्यच म्हणावे लागेल.

कारण अननसाच्या पिकाला जे हवामान, माती हवी असते ती गोव्यात उपलब्ध आहे. पण जायंट कीव अननस जास्त रसाळ असतो. त्याचा गोडवा वेगळाच असतो. त्याचा आकारही मोठा असतो. क्वीन व रेड स्पॅनिश या प्रकारांमध्ये जास्त रस नसतो.

इतर देशांमध्ये डबाबंद (कॅनिंग) उत्पादनांसाठी अननसाचा जवळजवळ ९५ टक्के वापर होतो तर केवळ ५ टक्के खाण्यासाठी वापरतात. पण भारतातील स्थिती याच्या अगदी उलट आहे.

तरी आता हळूहळू भारतात व गोव्यात अननसाचा वापर डबाबंद उत्पादनांसाठी होणे सुरू झाले आहे, असे चार वर्षांपूर्वी केपे येथे अननसाची लागवड सुरू केलेल्या बाणावली येथील समीर अवदी यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, अननसाचा वापर जॅम, ज्यूस, चंग्स (शिरा, केकला वापरतात) यांच्या उत्पादनासाठी होत असतो.

दरम्यान, सांगे येथील कृषी अधिकारी अग्रेश शिरोडकर यांनी सांगितले की, अननसाच्या उत्पादनासाठी प्रतिहेक्टर १.२० लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. त्याचप्रमाणे एक हजार चौरस मीटर जागेतील ४,५०० सकर्स लागवडीला ४८ हजार रुपये अनुदान मिळू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT