File Photo Burning Car  Dainik Gomantak
गोवा

केदारनाथचे दर्शन घेऊन परतणाऱ्या गोव्यातील भाविकांच्या वाहनाला आग

सर्व प्रवासी सुखरूप, गाडीचे नुकसान

Akshay Nirmale

Goa pilgrims Car burned at Kedarnath: चारधाम यात्रेला गेलेल्या गोव्यातील भाविकांच्या वाहनाला अपघात झाला आहे. उत्तराखंडमधील केदारनाथचे दर्शन घेऊन परतत असताना अचानक त्यांच्या वाहनाने पेट घेतला. प्रवाशांनी गाडीबाहेर उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला आहे. सुदैवाने या घटनेत जीवीतहानी झालेली नाही. (Chardham Yatra)

गोव्याचे रहिवासी असलेले अमित कुमार हे पत्नी आणि मुलासह वाहनाने केदारनाथ यात्रेला आले होते. बुधवारी ते केदारनाथचे दर्शन करून ते जम्मू-फाटा येथे परतत असताना ही घटना घडली.

केदारनाथचे दर्शन घेऊन हॉटेलच्या दिशेने या भाविकांची गाडी येत होती. यावेळी रस्त्यात मध्येच अचानक बॉनेटमधून धुर येऊ लागला. ही बाब ड्रायव्हरच्या लक्षात आल्यावर त्याने तत्काळ गाडी थांबवली. बॉनेट उघडून बघितल्यावर बॅटरीच्या तारा जळाल्याचे समोर आले.

यावेळी अचानक गाडीने पेट घेतला. गाडीला आग लागल्याचे लक्षात येताच प्रवासी पटापट गाडीबाहेर पडले. सर्वजण गाडीपासून दूर सुरक्षित अंतरावर जाऊन उभे राहिले.

या घटनेची नोंद स्थानिक पोलिसांत झाली आहे. पोलीस उपअधीक्षक विमल रावत यांनी, गाडीची बॅटरी गरम झाल्याने आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे. या घटनेत वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT