Vedanta Mining Controversy Pilgao Canva
गोवा

Pilgao: 'वेदांता'चा मार्ग मोकळा! खनिज वाहतुक प्रकरणी दिशाभूल केल्याने पिळगाव ग्रामस्थाची बिनशर्त माफी

Vedanta Mining Controversy Pilgao: पिळगाव ग्रामस्थांनी गावातून जाणाऱ्या रस्त्यावरून खनिज वाहतूक करण्यास विरोध केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी अनिल सालेलकर याने माफीचा अर्ज सादर केला होता.

Sameer Panditrao

Pilgao Mineral Transport

पणजी: डिचोली तालुक्यातील पिळगावातून खनिज वाहतुकीला विरोध करणाऱ्यांमध्ये सहभागी नसल्याची दिशाभूल करणाऱ्या माहितीचा पर्दाफाश वेदांता कंपनीने केल्यानंतर अनिल सालेलकर यांनी बिनशर्त माफी मागितली.

या माफीला कंपनीने विरोध केला मात्र त्याने खनिज वाहतुकीला अडथळा करणार नसल्याचे मान्य केल्याने उच्च न्यायालयाने माफी दिली. सरकारने खनिज वाहतुकीसाठी सुचविलेल्या पर्यायी रस्त्यावरून वाहतूक करण्यास न्यायालयाने परवानगी दिल्याने वाहतुकीचा वेदांताचा मार्ग मोकळा झाला आहे.

पिळगाव ग्रामस्थांनी गावातून जाणाऱ्या रस्त्यावरून खनिज वाहतूक करण्यास विरोध केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी अनिल सालेलकर याने माफीचा अर्ज सादर केला होता. मात्र या अर्जाला वेदांता कंपनीने विरोध केला होता.

अनिल सालेलकर हे कंपनीचे माजी कर्मचारी होते. त्यांनी प्रतिज्ञापत्रात सादर केलेली माहिती खोटी व दिशाभूल करणारी आहे. त्यांनी खनिज वाहतूक रोखण्यासाठी त्यांचा सहभाग नव्हता असे म्हटले होते. मात्र त्यांचा आंदोलनात सहभागी असल्याचा पर्दाफाश पत्रकार परिषदा तसेच प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांतून झाला आहे.

हे प्रकरण खंडपीठासमोर आल्याने त्यांनी यातून सुटका घेण्यासाठी ही बिनशर्त माफीद्वारे संरक्षण घेण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीकडून त्यांचा स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे त्यांना माफी दिली जाऊ नये असा युक्तिवाद कंपनीच्या वकिलांनी केला होता.

खनिज वाहतूक न अडवण्याचे निर्देश

दरम्यान, पिळगाव गावातून जाणारा पूर्वीचा रस्ता ग्रामस्थांनी आंदोलन करून खनिज वाहतुकीला बंद केल्याने सरकारने त्याच रस्त्याच्या बाजूने पर्यायी रस्ता वेदांता कंपनीला खनिज वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिला आहे. या रस्त्यावरून जाणारी खनिज वाहतूक ग्रामस्थांना न अडवण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनीला या रस्त्यावरून रात्रीच्यावेळी खनिज वाहतूक फेऱ्या करण्यास दिलेली परवानगी मागे घेतली असल्याचे खंडपीठाला सरकारने सांगितले. त्यामुळे ही खनिज वाहतूक पूर्वीप्रमाणे दिवसाच होणार असून मिळालेल्या परवानगीनुसार दिवसागणिक १२७ फेऱ्या मारता येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT