Mining operations in Goa Mulgao
डिचोली: मुळगावमधील खनिजप्रश्नी निर्माण झालेल्या गुंत्याच्या पार्श्वभूमीवर डिचोलीचे मामलेदार प्रवीण गावस आणि अन्य सरकारी अधिकाऱ्यांसह उपजिल्हाधिकारी आज (शुक्रवारी) सायंकाळी मुळगाव खाणीची संयुक्त पाहणी केली. यावेळी कृषी, वन, अग्निशमन दल आदी संबंधित सरकारी खात्यांचे तसेच ‘वेदांता’चे अधिकारी उपस्थित होते.
मुळगाव गावाच्यावतीने सरपंच मानसी कवठणकर, उपसरपंच गजानन मांद्रेकर अन्य पंच सदस्य तसेच देवस्थान, शेतकरी, कोमुनिदाद आदी ग्रामसंस्थांचे प्रतिनिधी पाहणीवेळी उपस्थित होते. या पाहणीवेळी ग्रामस्थांनी उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर म्हणणे मांडून गावचे प्रश्न सुटेपर्यंत खाण सुरू करू नका, अशी मागणी केली. खाणीच्या पायथ्याशी असलेल्या नैसर्गिक तळ्यातील गाळ काढावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. पुढील निर्णय होईपर्यंत मुळगावची खाण बंदच ठेवा असा उपजिल्हाधिकाऱ्यानी आदेश दिला.
२०११ साली भर पावसात मुळगाव खाणीवरील दरड कोसळली होती. त्या घटनेची पुनरावृत्ती होता कामा नये. त्यासाठी खाणीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे या कामासाठी ग्रामस्थांचा विरोध नाही. मात्र, गावच्या प्रश्नांची सोडवणूक होईपर्यंत खाण बंदच ठेवावी, असे सरपंच मानसी कवठणकर, माजी सरपंच वसंत गाड आणि कोमुनिदादचे अध्यक्ष महेश्वर परब यांनी स्पष्ट केले. प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना खाणीवरील कामकाजावर आम्ही देखरेख ठेवणार, असेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.