huge mango tree falls on house in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! पिळगावात मध्यरात्री घरावर कोसळला भलामोठा आम्रवृक्ष; विधवा महिला थोडक्यात वाचली

Pilgao Panchayat Mathwada Tree Collapse: पावसाच्या जोरदार तडाख्यात पिळगाव पंचायत क्षेत्रातील माठवाडा येथे एका गरीब विधवा महिलेच्या घरावर भलामोठा आम्रवृक्ष कोसळून घराचे मोठे नुकसान झाले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली : पावसाच्या जोरदार तडाख्यात पिळगाव पंचायत क्षेत्रातील माठवाडा येथे एका गरीब विधवा महिलेच्या घरावर भलामोठा आम्रवृक्ष कोसळून घराचे मोठे नुकसान झाले. मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने भर पावसाळ्यात संबंधित महिलेवर बेघर होण्याची वेळ आली आहे.

पुजिता पुंडलिक कवळेकर यांच्या घरावर घरालगत असलेला जीर्ण आम्रवृक्ष कोसळल्याने घराचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला. घरातील साहित्य तसेच घरासमोर उभी असलेली त्यांच्या दिवंगत पतीची दुचाकीही नुकसानग्रस्त झाली. या दुर्घटनेत एक लाख रुपयांहून अधिक किमतीच्या मालमत्तेची हानी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटना घडली त्यावेळी पुजिता कवळेकर या संभाव्य धोक्याची जाणीव झाल्याने शेजारी राहणाऱ्या जाऊबाईंच्या घरी झोपण्यासाठी गेल्या होत्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ‘‘झाड कधीही कोसळू शकते, अशी भीती वाटत होती.

देवाच्या कृपेने मी वाचले,’’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कोसळलेला वृक्ष वीजवाहिन्यांवर पडल्याने वीजतारा तुटल्या तसेच दोन वीजखांबही जमीनदोस्त झाले. त्यामुळे माठवाडा परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. वीज खात्याचेही मोठे नुकसान झाले.

सहकार्याचे आश्‍वासन!

या घटनेची माहिती मिळताच मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांनी पुजिता कवळेकर यांना धीर देत आर्थिक मदतीबरोबरच घर दुरुस्तीसाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पिळगावचे पंचसदस्य आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे पुजिता कवळेकर यांना सध्या शेजाऱ्यांच्या घरी आश्रय घ्यावा लागत असून, भर पावसाळ्यात त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT