Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : नानोडा-दोडामार्ग रस्त्यालगत कचऱ्याच्या राशी; लाटंबार्से गाव अस्वच्छतेच्या विळख्यात

Bicholim News : पंचायतीतर्फे कडक कारवाई करणार

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News : डिचोली, महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील कचऱ्याची समस्या कायम आहे.

महाराष्ट्रातील दोडामार्गला जोडलेल्या नानोडा-कासारपाल रस्त्यावर तर कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून, या रस्त्याला अस्वच्छतेचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे.

या समस्येबद्दल लाटंबार्सेचे सरपंच पद्माकर मळीक यांनी खंत व्यक्त करतानाच, कचरा टाकणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

लाटंबार्से पंचायतीच्या कार्यकक्षेत येणारा आणि दोडामार्गला जोडलेला रस्ता अस्वच्छतेच्या विळख्यात अडकला आहे. हा रस्ता कचराफेकूंनी ''टार्गेट'' केल्याचे दिसून येते. रोज शेकडो वाहनांची ये-जा असणाऱ्या या रस्त्यावर विविध ठिकाणी प्लास्टिकसह अन्य कचरा साचल्याचे आढळून येते.

दंडात्मक कारवाईचे संकेत

खराब झालेले खाद्यपदार्थही उघड्यावर टाकण्यात येत असून, ते खाण्यासाठी श्वान आणि गुरांचाही या भागात मुक्त संचार असतो. काही ठिकाणी तर उकीरडाच झाला असून कचऱ्याची दुर्गंधी पसरल्याचे जाणवते. या रस्त्याच्या बाजूने काही ठिकाणी तर मद्याच्या रिकाम्या बाटल्या आणि कॅन टाकले आहेत.

लाटंबार्सेचे सरपंच पद्माकर मळीक म्हणाले की, पंचायत क्षेत्रात सोध्या कचऱ्याची समस्या आहे. खास करून महाराष्ट्राला जोडणाऱ्या रस्त्याला तर अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे. गावाबाहेरील काहीजण हा कचरा टाकतात.

आलिशान वाहनामधून फिरणारेही कचरा टाकतात. असे कानावर पडले आहे. ही चिंतेची बाब आहे. यापुढे कचरा टाकणाऱ्यांची गय केली जाणार नाही. कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करून कचरा समस्या नियंत्रणात आणली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT