Pig in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: रानडुक्कर होणार ‘उपद्रवी’ घोषित

राज्यात रानडुकरांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: रानडुकराला उपद्रवी (वर्मिन) प्राणी घोषित करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी वन खात्याला सोमवारी (दि. ५) दिले. ही प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची सूचना त्यांनी सचिवालयात घेतलेल्या बैठकीत केली. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती, या आदेशामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात रानडुकरांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. डुकरांच्या बंदोबस्ताची मागणी जोर धरत असल्याने अखेर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. सचिवालयात सोमवारी वन खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पीक नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर रानडुकराला वर्मिन जाहीर करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, अशी सूचना केली.

जमीन हक्क कायद्यांतर्गत जमिनींचे सर्वेक्षण करण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्यात आलेली नाही. एजन्सीची नियुक्ती करून सर्व्हेची कामे वेगाने पूर्ण करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. काही राज्यांनी यापूर्वीच रानडुकराला वर्मिन घोषित केले आहे. गोवा विधानसभेत या विषयावर अनेकवेळा चर्चा झाली. पण अनेक वर्षांपासून अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे निर्णय झाला नव्हता. आता मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. यामुळे शेतकरी-बागायतदारांना दिलासा मिळणार असल्याचे गोवा बागायतदार संघटनेकडुचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर यांच्याकडुन सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT