Benaulim Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: टेम्पोच्या धडकेत जखमी दुचाकीस्वार युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू; बाणावलीतील घटना

जनरेटरची वाहतूक करणारा भरधाव टेम्पो थेट रस्त्याशेजारील फार्मसीमध्ये घुसला होता

सुशांत कुंकळयेकर

Bike Rider Dies In Benaulim Accident: बाणावली पुलवाडो येथील अपघातातील जखमी युवकाचे अखेर उपचारा दरम्यान सोमवारी निधन झाले.

रविवारी संध्याकाळी येथील नाक्यावर जनरेटरची वाहतूक करणाऱ्या भरधाव टेम्पोने मृत रोहीतच्या दुचाकीला धडक दिली होती.

धडकेत रोहीत गंभीर जखमी झाला होता. गंभीर अवस्थेत गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. राहीत रेडकर (२५) हा झोमॅटोमध्ये फूड डिलीव्हरीचे काम करीत होता.

बाणावलीत पुलवाडो येथील नाक्यावर रविवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास अपघाताची ही घटना घडली होती. वार्काकडून मडगावच्या दिशेने जनरेटरची वाहतूक करणारा भरधाव टेम्पो थेट रस्त्याशेजारील फार्मसीमध्ये घुसला होता.

रविवार असल्याने फार्मसी बंद होती. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. टेम्पोचालक निर्मल कुल्हू (रा. मूळ झारखंड) याला दुखापत झालेली आहे. त्याच्यावर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत.

भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपने सुरवातीला दुचाकीला धक्का दिला. त्यानंतर पिकअप चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा टेम्पो थेट रस्त्याशेजारील फार्मसीच्या दुकानात घुसला होता.

या घटनेनंतर कोलवा पोलिसांनी बेदकारपणे गाडी चालवून जीवितहानी केल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT