Phonda Municipality  Dainik Gomantak
गोवा

फोंडा पालिकेचा सोपो कराचा लिलाव करण्याचा निर्णय

फोंडा पालिका बैठक ; क्रांती मैदानाचे होणार नूतनीकरण

दैनिक गोमन्तक

फोंडा : फोंडा पालिकेच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत पालिकेचा सोपोकर, क्रांती मैदान, शास्त्री मॉल तसेच व्यापाऱ्यांसाठीच्या व्यावसायिक कराबरोबरच इतर अन्य विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

फोंडा पालिकेचा सोपो कर गोळा करण्यासाठी लीलाव करण्यात येणार असून येत्या जुलै महिन्यात संबंधित कंत्राटदाराकडून सोपो कर गोळा करण्यात येणार आहे. सध्या पालिकेच्या कामगारांकडून सोपो कर गोळा केला जात असला तरी पालिकेला अपेक्षित महसूल मिळत नसल्याने शेवटी सोपो कराचा लीलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला.

फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक उपस्थित होते. या बैठकीला उपनगराध्यक्ष तसेच इतर नगरसेवक व पालिका मुख्याधिकारी योगिराज गोसावी व इतर अधिकारी उपस्थित होते.

फोंडा पालिकेचा सोपो कराचे कंत्राट येत्या जुलै महिन्याच्या सुरवातीला किंवा मध्यावधीला देण्यात येणार आहे. सोपा कराचा लीलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लीलाव स्विकारणाऱ्या कंत्राटदारामार्फतच हा सोपो कर गोळा केला जाईल. फोंडा पालिका क्षेत्रातील दुकानदार व आस्थापनांचा वाढीव व्यावसायिक कर कमी करून तो पाच हजार रुपयांवरून आता दोन हजार रुपये करण्यात येईल. वैद्यकीयसंबंधी आस्थापनांना त्यापेक्षाही कमी व्यावसायिक कर आकारण्यात येणार आहे. शास्त्री मॉल प्रकल्पासंबंधीही यावेळी चर्चा झाली.

फोंडा शहर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय झाला. पालिका क्षेत्रातील गैरव्यवहार व गुन्हे कमी करण्यासाठी या सीसीटीव्हीचा वापर केला जाणार आहे.

फोंड्यातील क्रांती मैदानाच्या काही भागाचा ताबा लष्कराकडे असून पालिकेकडे त्यांनी करार केला आहे, मात्र हा करार संपुष्टात आला असून पालिकेला देय असलेले मागचे सहा लाख अजून लष्कराकडून मिळाले नसल्याने या कराराचे नूतनीकरण न करण्यासंबंधीचा निर्णय झाला. याशिवाय मैदानावर असलेला पाण्याचा कारंजा हटवून मध्यभागी असलेले खांब बाजूला उभे करून त्या ठिकाणी स्वातंत्र्यसैनिकांची नावे अधिक चांगल्या व आकर्षकरीत्या करण्यासंबंधीचाही निर्णय झाला.

बांधकामांचीही होणार चौकशी

फोंडा पालिकेच्या आफ्रामेंत जमिनीत बेकायदा बांधकामे करण्यात आली आहेत, त्यासंबंधीचा विषय बैठकीत चर्चेला आला. या बांधकामासंबंधीची चौकशी करून त्यावर कारवाई करण्याचा निर्णयही यावेळी झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Board HSSC Result: 12 वीचा निकाल जाहीर! 92.96% विद्यार्थी उत्तीर्ण, यंदाही मुलींनीच मारली बाजी

Goa Accident: नाकेरी-बेतुल येथे भीषण अपघात; 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, भटक्या गुरांचा अडथळा ठरला जीवघेणा

KKR ला दुसरा 'मोठा' झटका! हर्षित राणानंतर आता 'हा' मॅचविनर खेळाडू IPL 2026 मधून बाहेर

Viral Video: 'डायपर'चा असाही वापर! कोल्ड-ड्रिंक थंड ठेवण्यासाठी तरुणाचा 'देसी जुगाड', पाहा कसं बनवलं घरगुती मिनी फ्रीज

पदार्पण असावं तर असं! 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 पदार्पणातच झळकावलं शतक, रचले दोन विश्वविक्रम Watch Video

SCROLL FOR NEXT