Canacona Police Dainik Gomantak
गोवा

Canacona Police: काणकोण पोलिस कर्मचाऱ्यांचे दातृत्व; 'श्रमधाम' योजनेसाठी दिला 62500 रूपयांचा निधी

सभापती रमेश तवडकर यांच्याकडे धनादेश सुपूर्द; या योजनेतून निराधारांना घर बांधून दिले जाते

Akshay Nirmale

Canacona Police: काणकोण पोलिस स्टेशनमधील पोलिस कर्मचाऱ्यांनी 62 हजार 500 रूपयांचा निधी श्रमधाम या योजनेसाठी दिला आहे. या रकमेचा धनादेश विधानसभेचे सभापती आणि काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

श्रमधाम ही रमेश तवडकर यांची संकल्पना आहे. यातून निराधार नागरिकांना नवीन घर बांधून दिले जाते. गेल्याच महिन्यात 15 जून रोजी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते श्रम-धाम योजनेतील वीस घरांचे हस्तांतरण करण्यात आले होते.

श्रम-धाम योजनेच्या सचित्र माहिती पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी झाले होते. पुस्तकात सर्व वीसही घरांची व घरमालकांची माहिती आहे. त्यांचा पूर्वीचा निवारा, त्यानंतर घराची बांधणी व पूर्ण घराची बांधणी झालेले फोटो आहेत.

मार्च महिन्यात या योजनेला सुरवात झाली होती. राज्यातील प्रत्येक व्यक्तीने एक रुपया किंवा एक दिवस या उपक्रमासाठी देण्याचे आवाहन तवडकर यांनी केले होते.

त्यानंतर राज्यभरातून आर्थिक मदत त्याचबरोबर श्रम करण्यासाठी कार्यकर्ते शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवसांत काणकोणात राबले होते. आगामी दोन ते तीन वर्षांत काणकोण मतदारसंघात या योजनेतून दीडशे घरे उभारण्याचा तवडकर यांचा मानस आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT