Goa College of Pharmacy Dainik Gomantak
गोवा

Goa Pharmacy Student: फार्मसी पदव्युत्तर विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित; विद्यार्थ्यांत निराशा

‘एआयसीटी’कडून नकारघंटा, ताबा फार्मसी कौन्सिलकडे

दैनिक गोमन्तक

दरवर्षी देशपातळीवर ‘जीपॅट’ परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या फार्मसी शाखेतील विद्यार्थ्यांना दरमहा साडेबारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळत होती.

मात्र, यावर्षीपासून फार्मसी शिक्षणाचा ताबा ‘एआयसीटी’कडून फार्मसी कौन्सिलकडे गेला असून ‘एआयसीटी’ने शिष्यवृत्ती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे यंदा पदव्युत्तर फार्मसी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक शिष्यवृत्तीला मुकावे लागणार आहे.

गेल्या वर्षापासून फार्मसी शिक्षणाचा ताबा अखिल भारतीय तंत्र परिषद अर्थात ‘एआयसीटी’कडून फार्मसी कौन्सिलकडे गेला. ‘एआयसीटी’कडून पदवीधर फार्मसी पात्रता चाचणी ‘जीपॅट’ घेतली जात होती,त्यात प्राविण्य मिळवणाऱ्या तीन हजार विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती दिली जात होती.

गोव्यात सदर चाचणी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय असून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊनही शिष्यवृत्ती पासून वंचित रहाण्याची पाळी यंदा विद्यार्थ्यांवर येणार असल्याचे दिसून येत आहे.

पदवीनंतर पुढील शिक्षण अथवा फार्मसी आस्थापनात नोकरी करणे असे दोन पर्याय विद्यार्थ्यांसमोर असतात. परंतु यंदा शिष्यवृत्ती मिळणार नसल्याने आर्थिक समस्येमुळे अनेक विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणाचा विचार सोडला आहे.

विद्यार्थ्यांच्या संख्येत घट

गोव्यात दोन्ही फार्मसी महाविद्यालयातील सहा विविध शाखांत सुमारे पाऊणशे पदव्युत्तर जागा उपलब्ध असतात. गेल्या काही वर्षात एम. फार्मला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचे असल्याचे दिसून येत आहे.

गोवा फार्मसी महाविद्यालय या सरकारी महाविद्यालयातील फार्मा, केमिस्ट्री या शाखेत सोळा पैकी केवळ चार जागा भरल्या होत्या. यंदा शिष्यवृत्ती न मिळाल्यास फार्मा, केमिस्ट्री या शाखे बरोबरच इतर शाखांतील जागा रिक्त रहाण्याची शक्यता आहे.

अभ्यासक्रम सुरू करा!

गोवा फार्मसी महाविद्यालयात ''फार्मास्युटिक्स'' या महत्वाच्या शाखेत पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याची मागणी औद्योगिक आस्थापने व विद्यार्थी करत आहेत.

परंतु नवीन शाखा सुरु केल्यास प्रस्थापित काही शाखात प्रवेश शून्यावर येईल या भीतीपोटी ''फार्मास्युटिक्स'' शाखेत पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु केला जात नाही, असा अंदाज आहे.

औषध आस्थापने व विद्यार्थी यांचे हित लक्षात घेऊन हा पदव्युत्तर अभ्यासक्रम त्वरित सुरू करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

"विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी की न द्यावी, हा सर्वस्वी कौन्सिलचा विषय आहे. हा राष्‍ट्रीय स्तरावरील विषय असून आपण यावर भाष्य करणे योग्य नाही. फार्मसी कौन्सिल यावर विचारमंथन करत आहे."

- डॉ.जी.के. राव, प्राचार्य फार्मसी महाविद्यालय

"पूर्वी एआयटीसी इंजिनियरींग आणि फार्मसी कौन्सिल एक होती. आता फार्मसी कौन्सिल वेगळे आहे, त्यामुळे शिष्यवृत्तीबाबत सर्वस्वी त्यांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे .हा राष्‍ट्रीय स्तरावरील विषय आहे."

-प्रदीप कुसनूर, तंत्र शिक्षण संचालनालय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT