Petrol and diesel Dainik Gomantak
गोवा

Petrol-Diesel Price In Goa: खूशखबर! पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, काय आहेत गोव्यातील आजचे इंधनाचे दर

भारतात 85 टक्के कच्चे तेल आयात केले जाते, 2014 पासून तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात.

Pramod Yadav

Petrol-Diesel Price In Goa: इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे जनतेच्या खिशावर अतिरिक्त बोजा पडत आहे. पण, कच्चा तेलाच्या किमती घटल्याने लवकरच पेट्रोल, डिझेलचा दर प्रति लिटर 14 रूपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. मे महिन्यांतर प्रथमच पेट्रोल -डिझेलचे दर कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमती (International Crude Oil Prices) प्रति बॅरल 81 डॉलरवर आल्या आहेत. अमेरिकी कच्चा तेलाचा सरसरी भाव प्रति बॅरल 74 डॉलर प्रति झाला आहे. भारतीय रिफायनरीसाठी सरासरी प्रति बॅरल 82 डॉलरवर आल्या आहेत. मार्चमध्ये त्याची किंमत प्रति बॅरल 112.8 डॉलर होती.

भारतात 85 टक्के कच्चे तेल आयात केले जाते, 2014 पासून तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात.

असे आहेत गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.84

  • Panjim ₹ 97.84

  • South Goa ₹ 97.41

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.39

  • Panjim ₹ 90.39

  • South Goa ₹ 89.97

Goa LPG Price

  • Panjim ₹ 1,053.00 /14.2 KG

  • South Goa ₹ 1,067.00 /14.2 KG

बुधवारच्या तुलनेत दोन्ही जिल्ह्यात इंधनाच्या किंमतीत किरकोळ बदल झाले आहेत.एलपीजीच्या किंमती मात्र स्थिर आहेत.

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shul Yog 2026: 14 जूनपासून ग्रहांचा मोठा प्रकोप! 'शूल योग' आणणार 5 राशींच्या आयुष्यात मोठं वादळ; नवीन नातं जोडताना शंभर वेळा विचार करा

Goa Betting Links: क्रिकेट सट्टेबाजी अन् मनी लॉन्ड्रिंगचे धागेदोरे अखेर गोव्यापर्यंत; वर्ध्यातील बडे क्रिकेट बुकी पोलिसांच्या रडारवर

Goa Politics: मगो पक्ष राष्ट्रीय पक्षांच्या दावणीला, ढवळीकरांवर प्रा. युगांक नाईकांची घणाघाती टीका; स्वतःचं मंत्रिपद टिकवण्यावर दिला भर

Goa Electric Vehicles: चार्जिंग स्टेशन अभावी होणारी ई-वाहनधारकांची वणवण आता थांबणार; प्रमुख रस्ते, हायवे आणि पर्यटनस्थळांवर होणार नव्या केंद्रांची निर्मिती

Goa Fishing: मच्छीमारी ट्रॉलर चालणार आता 'हायड्रोजन'वर; डिझेल दरवाढीतून मुक्तता, मासेमारी क्षेत्रात नवे पर्व होणार सुरु

SCROLL FOR NEXT