मुंबई: गेल्या दीड वर्षांपासून इंधनाच्या (Fuel Price) दरात सातत्याने वाढ होत असून शनिवारीदेखील देशभरात पुन्हा इंधनाचे भाव वधारले आहेत. मुंबईत एका लिटरमागे पेट्रोल 34; तर डिझेल 28 पैशांनी महाग झाले आहे. मुंबईत पेट्रोलची सध्या 106.63; तर डिझेलची 97.46 रुपये प्रतिलिटर दराने विक्री होत आहे. ही दरवाढ अशीच सुरू राहिल्यास पेट्रोलच्या सेंच्युरीनंतर डिझेलच्या दराची सेंच्युरीसुद्धा लवकरच होण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे सार्वजनिक प्रवासी सेवा ठप्प झाल्याने खासगी वाहनांचा वापर वाढवला आहे. त्यामुळे दैनंदिन इंधनाचा खप सुद्धा वाढल्याने दरात वाढ होत असल्याचे सांगण्यात आले आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना कोरोना संकटासोबतच महागाईचाही सामना करावा लागत आहे. घरगुती सिलिंडरचे दरही वाढत आहेत. त्यात इंधन दराच्या भडक्याने सामान्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काल कॉग्रेस पक्षातर्फे भाजप सरकारच्या (BJP Government) विरोधात घोषणा देत मडगावमधील लोहिया मैदानापासून ते दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत (South Goa Collectorate Office ) सायकल मोर्चा रॅली काढण्यात आली . कच्चा तेलाचे दर कमी असूनही सरकार पेट्रोल (Petrol), डिझेल आणि घरगूती सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली असून केंद्र सरकारने याची दखल घेऊन त्वरित पेट्रोल 35 रुपये प्रतिलीटरच्या दरात द्यावे, अशी मागणी कॉग्रेस पक्षातर्फे करण्यात आली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.