Bombay Highcourt Goa Bench  Dainik Gomantak
गोवा

‘एमपीएचडब्ल्यू’ भरतीला आव्हान; आणखी एक याचिका दाखल

नियुक्त उमेदवारांना निवाडा बंधनकारक, खंडपीठाचे स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

पणजी : आरोग्य खात्यातील ‘एमपीएचडब्ल्यू’ (मल्टीपर्पज हेल्थ वर्कर्स) पदासाठीच्या नोकरभरती प्रक्रियेला मिनल शिरोडकर यांनी आव्हान दिलेली याचिका काल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कामकाजात दाखल करून घेतली. या याचिकेवरील निवाडा नियुक्त झालेल्या उमेदवारांना बंधनकारक असेल,असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. विविध खात्यातील नोकरभरतीला आव्हान दिलेल्या इतर याचिकांसोबत ही याचिका जोडून ती अंतिम सुनावणीसाठी ठेवली. (Bombay Highcourt Goa Bench News Updates)

कोरगाव येथील मिनल शिरोडकर यांनी याचिकेत सरकारसह, (Goa Government) कार्मिक विभाग, आरोग्य अवर सचिव, आरोग्य खाते व निवड झालेल्या 59 जणांना प्रतिवादी केले आहे. ‘एमपीएचडब्ल्यू’ या पदासाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. ही निवड नियम डावलून केल्याचा दावा याचिकादाराने केला आहे. या याचिकेवरील प्राथमिक सुनावणीनंतर गोवा खंडपीठाने सरकारला आणि निवड झालेल्या उमेदवारांना नोटीस बजावून त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत.

या पदांसाठी ऑगस्ट 2021 मध्ये जाहिरात देण्यात आली होती. याचिकादाराने त्यासाठी अर्ज केला होता. 18 ऑक्टोबर 21 रोजी लेखी परीक्षा (Examination) दिली होती. 7 डिसेंबर 21 रोजी निवड समितीची बैठक झाली होती, मात्र प्रतिनिधीला बोलावण्यात आले नव्हते. छाननी समितीसमोर गुणवत्ता यादी सादर केली नव्हती. माहिती अधिकाराअंतर्गत 16 डिसेंबर 2021 रोजी याचिकादाराने खात्याला पत्र पाठवून नोकरभरतीची (Recruitment) स्थिती विचारली होती. 6 जानेवारी 2022 रोजी याबाबत बनावट आणि अर्धवटच माहिती देण्यात आली असा दावा याचिकाकर्तीने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT