Nevy Dainik Gomantak
गोवा

Indian Navy: नौदलाकडून जनतेची सतावणूक; मुरगाव पालिका मंडळाचा आरोप

Indian Navy: तोडगा न निघाल्यास पुन्हा बैठक घेऊ, असे मुरगावचे नगराध्यक्ष गिरीष बोरकर यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

Navy:

नौदलातर्फे बांधकामासाठी ना हरकत देताना सतावणूक केली जात असल्याने राज्य सरकारने यात हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचा सूर मुरगाव पालिका मंडळाच्या खास बैठकीत नगरसेवक, बिल्डर, रहिवासी यांच्यामधून उमटला.

यावेळी काहीजणांनी नौदलाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. त्यांच्याकडून समर्पक उत्तरे मिळू शकली नाहीत. याप्रकरणी नौदलाने 30 दिवसांत तोडगा काढावा, अशी विनंती केली आहे. तोडगा न निघाल्यास पुन्हा बैठक घेऊ, असे मुरगावचे नगराध्यक्ष गिरीष बोरकर यांनी सांगितले.

फनेल झोनमध्ये बांधकामे येत असल्याचा दावा करून सुमारे ३५ वर्षांपूर्वीची बांधकामे पाडण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी चिखली, चिकोळणा, बोगमाळो या पंचायत मंडळांनी नौदलाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

तेथे नौदलाच्या मोठमोठ्या इमारती आहेत; परंतु त्यातून मुरगाव पालिकेला महसूल मिळत नाही. तेथील सदनिकांचे भाडे देण्यास नौदल तयार नाही. त्यामुळे मंगळवारी या बैठकीला त्यांच्या प्रतिनिधींना आमंत्रित केले होते. सेड्रिक डायस यांनी नौदल कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचा उदाहरणांसह दावा केला.

चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव यांनी, नौदलाच्या या भूमिकेचा फटका चिखली पंचायतीलाच नव्हे, तर मुरगाव तालुक्यालाही बसू लागल्याचा दावा केला. मुरगाव पालिका मंडळाने जी संयुक्त बैठक घेतली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

नौदलाकडून स्पष्टीकरण नाहीच

नगरसेवक यतीन कामुर्लेकर यांनी भारतीय नौदलाने बांधकामांसंबंधी जी भूमिका घेतली आहे, त्यासंबंधी एखादे परिपत्रक दाखवावे, अशी विनंती केली. वास्को शहरापासून विमानतळ चार किलोमीटर दूर आहे.

तरीही नौदलाकडून बांधकामासाठी परवानगी घ्यावी लागते. यासंबंधी योग्य ते स्पष्टीकरण नौदलाकडून मिळत नाही. त्यामुळे नौदलाची लोकांच्या मनात वाईट प्रतिमा निर्माण होऊ लागली असल्याचे ते म्हणाले.

महसुलावर परिणाम

येथे विमानतळ असल्याने चार किलोमीटर हवाई अंतराच्या परिघामध्ये कोणतेही बांधकाम करताना नौदलाचा परवाना घेणे आवश्यक आहे. त्यामुळे गेल्या चार-पाच वर्षांत बरीच बांधकामे खोळंबली आहेत. सर्वसामान्यांसह बिल्डरांना मोठा फटका बसला आहे.

शिवाय पंचायत, पालिका यांच्या महसुलावर परिणाम झाला आहे. एखाद्याने नौदलाकडे बांधकाम परवान्यासाठी फाईल दिल्यावर 90 दिवसांमध्ये परवाना देण्याचा दंडक आहे. मात्र, दीड-दोन वर्षे परवानाच मिळत नसल्याचा दावा करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT