Goa Taxi Drivers Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi Driver Protest: वाहतूक विभागात ठिय्या; इतिवृत्तात आवश्यक बदल आणि मगच टॅक्सी व्यावसायिकांनी आंदोलन थांबवले

Goa Taxi Operator Protest: बैठकीचे इतिवृत्त लिहून घेतल्यानंतरच मोपा येथील व्यावसायिकांची माघार

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी/पेडणे: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पेडण्यातील टॅक्सी व्‍यावसायिकांनी सोमवारी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त आपल्याला हवे तसे लिहून घेतले आणि मंगळवारी रात्री १०.३० वाजता पेडण्यात मागील गुरुवारपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेतले.

त्यांनी विविध मागण्यांसाठी पेडण्याच्या सरकारी कार्यालय संकुलासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. राज्यातील विविध टॅक्सी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या समक्ष आधी शनिवारी तसेच काल आंदोलकांशी चर्चा केली. विमानतळावरून ‘गोवा माईल्स’ या ॲपवर आधारित टॅक्सीसेवेचा काऊंटर हटवावा, ही मागणी वगळता इतर मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या.

या बैठकीत वाहतूक खाते व विमानतळ चालवणाऱ्या जीएमआर कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. सरकारने बैठकीचे इतिवृत्त लेखी स्वरूपात देईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाऊ नये, अशी भूमिका सोमवारी रात्री घेतल्याने आंदोलन आजही सुरूच राहिले होते.

आंदोलकांना इतिवृत्त न मिळाल्याने त्यांनी आज सायंकाळी पणजीतील वाहतूक कार्यालयाचे मुख्यालय गाठले. त्यांना देण्यात आलेल्या इतिवृत्तात काही नोंदी संदिग्ध स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे अंमलबजावणीच्या पातळीवर दगाफटका होऊ शकतो, असे वाटल्याने इतिवृत्तात दुरुस्ती करून मिळावी यासाठी आंदोलक आग्रही राहिले. त्यानंतर रात्री ९.३० वाजता त्यांना दुरुस्त केलेले इतिवृत्त मिळाले आणि त्यांनी पेडण्याच्या दिशेने कूच केली.

प्रवीण आर्लेकरांच्या शब्दालाही नाही मान

पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर टॅक्सी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, बैठकीचे इतिवृत्त मिळत नाही, तोवर आंदोलन मागे घेणार नसल्याच्या निर्णयावर आंदोलक ठाम राहिले. टॅक्सी आंदोलक एवढे आक्रमक झाले की, त्यांनी आर्लेकरांच्या विनंतीलाही मान दिला नाही.

राजकीय वळण देण्याचा प्रयत्न

मांद्रेचे माजी सरपंच ॲड. अमित सावंत हे टॅक्सी आंदोलकांसोबत असल्याने ते राजकारण करू पाहात आहेत आणि मुख्यमंत्री तसेच आमदारांना टार्गेट करू पाहात आहेत, असे आरोप अप्रत्यक्षरित्या करून हे आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचे आरोपही झाले. आंदोलकांना काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने देखील पाठिंबा दिला होता. दरम्यान विरोधी पक्षनेते, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आम आदमी पक्षाचे आमदार आंदोलकांना भेटून त्यांच्या मागण्या योग्य असल्याचा विश्वास त्यांच्या मनात रुजविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT