Pernem Taxi operators chakka jam Dainik Gomantak
गोवा

'CM येत नाहीत तोवर एक इंचही मागे हटणार नाही'; Goa Miles विरोधात टॅक्सी व्यावसायिक आक्रमक, पेडण्यात 'चक्का जाम'

Pernem Taxi operators chakka jam:देव बाराजण येथे प्रार्थना करुन टॅक्सी चालकांनी चक्का जाम आंदोलनास सुरुवात केली.

Pramod Yadav

Pernem Taxi operators chakka jam

पेडणे: मोपा विमानतळावरी गोवा माईल्सच्या टॅक्सी काउंटर विरोधात टॅक्सी व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. व्यावसायिकांनी पेडण्यात विविध मागण्यांसाठी चक्का जाम केला आहे. उपजिल्हाधिकारी कार्यालयालसमोर एकवटत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत घटनास्थळी येऊन ठोस आश्वासन देत नाहीत तोवर एक इंचही मागे हटणार नाही, असा पवित्रा टॅक्सी चालकांनी घेतला आहे.

मोठ्या प्रमाणावर एकवटलेल्या आंदोलनकर्त्या टॅक्सी व्यावसायिकांच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅक्सी चालकांच्या या चक्का जाम आंदोलनात मोठ्या संख्येने चालक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी सहभाग घेतला आहे. सकाळी मोपा येथील देव बाराजण येथे प्रार्थना करुन टॅक्सी व्यावसायिकांनी चक्का जाम आंदोलनास सुरुवात केली.

हजारो टॅक्सी चालकांचा सहभाग असलेल्या या आंदोलनाने पेडण्यातील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. कार्यालयासमोर आंदोलकांनी घोषणाबाजी केली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत घटनास्थळी भेट देऊन ठोस आश्वासन देत नाही, तोवर एक इंचही मागे घटणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. दरम्यान, घटनास्थळी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

पेडणेकरांना मोपा विमानतळावर ब्ल्यु टॅक्सीसाठी परवाने दिलेत पण, विमानतळावरील इतर काउंटर्समुळे त्यांना व्यवसाय करण्यासाठी अडचणी येत असल्याची तक्रार टॅक्सी चालकांनी केली आहे.

पेडण्यातील चक्का जाम बाबत टॅक्सी चालकांनी बुधवारी (२१ ऑगस्ट) माहिती दिली होती. सकाळी देव बाराजणचे दर्शन घेऊन टॅक्सी व्यावसायिकांनी आंदोलनास सुरुवात केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT