Pernem is called the home of music Dainik Gomantak
गोवा

'पेडणे तालुका कलेची खाण'

शेटगावकर: कला महोत्सवाला रसिकांची दाद

दैनिक गोमन्तक

मोरजी: पेडणे तालुका हा कलेची खाण आहे आणि संगीताचे माहेरघर म्हटले जाते, असे प्रतिपादन कीर्तनकार ह.भ.प. व्ही.जी. शेटगावकर यांनी मांद्रे येथे केले.

मांद्रे येथील स्वरगंधा संस्था, श्री सातेरी देवस्थान समिती आणि कला आणि सांस्कृतिक संचालनालय पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसांचा कला महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवाचे उदघाटन केल्यानंतर शेटगावकर बोलत होते.

यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रीय कीर्तनकार सुहास वझे, संस्थेच्या अध्यक्षा तथा माजी कला आणि सांस्कृतिक मंत्री संगीता परब, सचिव सोमनाथ पार्सेकर, सरपंच प्रिया कोनाडकर, माजी सरपंच सुभाष आसोलकर, देवस्थान समिती अध्यक्ष पार्सेकर, सत्कारमूर्ती निवृत्ती शिरोडकर, अनघा आजगावकर, नीळकंठ मठकर, दादू पार्सेकर संतोष सावंत आदी उपस्थित होते.

कीर्तनकार सुहासबुवा वझे म्हणाले, सध्याच्या पिढीला संस्कारांची गरज आहे. वाचन संस्कृती टिकवण्यासाठी कीर्तनाकडे युवकांनी वळावे. सूत्रसंचालन सोमनाथ पार्सेकर यांनी तर सत्कारमूर्तींचा परिचय पांडुरंग गावडे यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

SCROLL FOR NEXT