'काणकोणातील बंद शाळांच्या इमारती सामाजिक कार्यासाठी देणार'

अर्ज करण्याचे शिक्षण खात्याचे आवाहन
Closed school buildings in Canacona will be given for social work
Closed school buildings in Canacona will be given for social work Dainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: काणकोण तालुक्यातील पटसंख्येअभावी बंद पडलेल्या नऊ सरकारी प्राथमिक शाळांच्या इमारती जागेसह वापरण्यास देण्यासाठी शिक्षण खात्याने प्रस्ताव तयार केला आहे.

त्यामध्ये राज्यातील 68 बंद शाळांचा समावेश आहे. सर्वाधिक शाळा फोंडा तालुक्यातील आहेत. 15 दिवसांच्या आत इच्छुक सामाजिक संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन शिक्षण संचालक भूषण सावईकर यांनी केले आहे.

Closed school buildings in Canacona will be given for social work
कधीपासून मिळणार मोफत सिलिंडर: गोव्यातील महिला

काणकोण पालिका क्षेत्रात किंदळे, देळे, लोलये पंचायत क्षेत्रात पेडे, बोरूस, तानशी, तामने, पैंगीण पंचायत क्षेत्रात शिशेव्हाळ, चिपळे व गावडोंगरी पंचायत क्षेत्रात तुडल येथे या इमारती आहेत. यापैकी काही इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत, तर काही इमारतींची छप्परे कोसळली आहेत.

मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना काणकोणच्या काही सामाजिक संस्थांनी या शाळा इमारती वापरण्यास देण्याची विनंती शिक्षणमंत्री व शिक्षण खात्याकडे केली होती. किमान त्यावेळी त्या इमारती काही प्रमाणात शाबूत होत्या. शिक्षण संचालकांनी दिलेल्या जाहिरातीत सरकारी कार्यालयांना पहिली पसंती देण्यात येणार, असे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Sattari River Drowning Cases
Mandrem Police Investigation
Bicholim Class 11 Admissions
Russian Woman Marriage Registration
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com