Minister Nilesh Cabra And MLA Pernem Pravin Arlekar  Dainik Gomantak
गोवा

Pernem News : नीलेश काब्राल यांनी आमदार आर्लेकरांची माफी मागावी

न्‍याय मिळेपर्यंत घेराव, उपोषण, मोर्चे काढत राहणार

दैनिक गोमन्तक डिजिटल

पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांना सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबाबत त्‍यांनी माफी मागायला हवी. जोपर्यंत काब्राल माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्‍ही आंदोनल टप्प्याटप्याने सुरूच ठेवू असा निर्धार पेडणे तालुका नागरिक समितीतर्फे पत्रादेवी हुतात्मा स्मारकावर फुले वाहून करण्यात आला. तसेच म्हादई नदीच्या रक्षणासाठी गांभीर्याने पावले उचलण्‍याचा निर्णयही घेण्यात आला.

या कार्यक्रमाला पेडणे तालुका नागरिक समितीचे उपाध्यक्ष सुजय मळीक, सचिव साईनाथ आपुले, खजिनदार मोहन तळवणेकर, सल्लागार समिती अध्यक्ष महादेव पटेकर, मारियानो फेर्राव, राजन घाटे, महेश वायंगणकर, रुपेश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. सजय मळीक, साईनाथ आपुले, महादेव पटेकर यांनीही काब्राल यांच्‍या कृतीचा निषेध केला.

न्‍याय मिळेपर्यंत घेराव, उपोषण, मोर्चे काढत राहणार

समितेचे निमंत्रक सदानंद वायंगणकर म्हणाले की, काब्राल यांनी आर्लेकर यांचा केलेला अपमान निषेधार्ह आहे. याप्रकरणी माफी मागण्यासाठी दिलेली मुदत संपल्याने आता आम्हाला आंदोलनाला सुरूवात करावी लागत आहे.

पहिल्या टप्‍प्यात आम्ही आजपासून सह्यांची मोहीम राबवणार आहोत व निवेदन मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान यांना सादर करणार आहोत.

काब्राल यांनी माफी मागितली नाही तर दुसऱ्या टप्प्यात निवेदने एकेरी भाषा वापरुन पाठवण्यात येतील. या व्यतिरिक्त न्याय मिळेपर्यंत संघटना घेराव, उपोषण, मोर्चा, पुतळे जाळणे अशा प्रकारे निषेध नोंदविणार आहे.

चार महिन्यांनंतर या आंदोलनाचा शेवट तेरेखोल या ऐतिहासिक किल्ल्याजवळ करण्‍यात येईल, असेही ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT