Pernem Road pit  Dainik Gomantak
गोवा

Pernem Road pit : रस्त्यावरचे खड्डे बुजवले; पण समस्या कायम!

पेडणे-देवसू मार्गाची स्थिती बिकटच : रस्त्यावर रोडरोलर न फिरवल्याने चालकांत संताप

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem Road pit : पेडणे ते देवसुपर्यंत सध्या एमआरडी १७ रस्त्याला पडलेले खड्डे बुजवण्याचे काम हरियाणा येथून आणलेल्या जेट पॅचर या आधुनिक यंत्राद्वारे सुरू आहे. पण या खड्ड्यांवर रोड रोलर न फिरवल्यामुळे काही ठिकाणी उंचवटे तयार झालेले आहेत. परिणामी वाहनांना हादरे बसत असून खड्डे बुजवले पण समस्या कायम असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया वाहनचालकांतून व्यक्त होत आहेत.

सविस्तर माहितीनुसार पेडणे ते हरमल या रस्त्यावरील पेडणे ते देवसू या आठ किमी अंतराच्या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण होऊन दहा वर्षांहून जास्त काळ उलटला आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्ता उखडून गेला आहे. पण उशिरा का होईना पणजी येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य कार्यालयाने ‘जेट पॅचर’द्वारे खड्डे बुजवण्याचे काम सुरु केले आहे.

पण पावसाळ्यात अशा ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहिल्यास वाहतूक करणे कठीण होणार आहे,असे एका त्रस्त चालकाने सांगितले. वाहतुकीसाठी व्यस्त असलेल्या या आठ किलोमीटर पर्यंतच्या रस्त्याचे आधीच हॉटमिक्स डांबरीकरण होणे गरजेचे होते.

रोडरोलर फिरवा !

बुजवलेल्या खड्ड्यांवर रोड रोलर न फिरवल्याने काही ठिकाणी उंचवटे तयार झाले असून अशा ठिकाणी वाहनांची चाके उचलतात. दुचाकीस्वारांचा वाहनावरील ताबा जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे. तर दहा बारा फुट अंतरापर्यंत पट्टे हे उंच सखल राहिल्याने वाहनांना हादरे बसतात.त्यामुळे ‘साबांखा’ने बुजवलेल्या खड्ड्यांवर रोडरोलर फिरवून रस्ता समतल करावा,अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT