Pernem  Dainik Gomantak
गोवा

Pernem News : पेडण्‍यात भातशेती गेली कुजून

Pernem Rice Agriculture : पाणी जायला मार्ग नसल्‍याने समस्‍या बनली आहे उग्र

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी, सतत पडत असलेल्या जोरदार पावसामुळे शेतीला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पाणी जायला मार्गही मोकळे नसल्याने शेती कुजून गेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना लावणी करावी लागणार आहे.

पेडणे तालुक्यातील धारगळ, मोरजी, मांद्रे, आगरवाडा, तुये, कोरगाव येथील शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्यामुळे शेती कुजून गेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना नव्या पद्धतीने पेरणी किंवा लावणी करावी लागेल. कृषी खात्याने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना झालेली नुकसान भरपाई देण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दरम्‍यान, केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना आहेत.

वाढत्‍या बांधकामांमुळे चिंता वाढली

शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची मुख्य कारणे अनेक आहेत. शेतीत पाणी जाण्याच्या वाटा बंद झालेल्‍या आहेत.

ठिकठिकाणी काही प्रमाणात मातीचे भराव टाकून बांधकाम, इमारती उभारल्‍याने पाणी शेतीतच साचून राहते. त्‍यासाठी स्थानिक पंचायतीने पुढाकार घेऊन शेतीतील पाणी जाण्याचे पूर्वीचे मार्ग मोकळे करणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT