Bihari Man arrested for stealing bag from Morjim Beach Dainik Gomantak
गोवा

बॅगमध्ये होते 3.5 लाखांचे साहित्य, पर्यटक मोरजी समुद्रात पोहायला गेले अन् बिहारच्या चोरट्याने डल्ला मारला, अखेर...

28 मे रोजी ही घटना त्यानंतर पंधरा दिवसांनी पेडणे पोलिसांनी बिहारचा रहिवाशी असलेल्या आरोपीला अटक केली आहे.

Pramod Yadav

Bihari Man arrested for stealing bag from Morjim Beach: मोरजी येथे बीचवर काही मित्र त्यांचे महागडे साहित्य बॅगमध्ये ठेऊन समुद्रात पोहायला गेले. या दरम्यान, त्यांच्या साहित्याची चोरी झाली. 28 मे रोजी ही घटना त्यानंतर पंधरा दिवसांनी पेडणे पोलिसांनी बिहारचा रहिवाशी असलेल्या आरोपीला अटक केली आहे. पेडणे पोलिसांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

पोलिसांनी गुलबार खुर्शिद (वय 19, रा. बिहार) याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचा आयफोन 11 प्रो 2, आयफोन 12, सॅमसंग S22 अल्ट्रा फोन, सॅमसंग फ्लिप 4 आणि एक स्कॉट कंपनीचा गॉगल असे एकूण 3 लाख 50 हजार रूपये चोरीचे साहित्य जप्त केले आहे.

तक्रारदार पर्यटकाच्या तक्रारीनंतर पेडणे पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरूण मोरजी चर्च येथे मोबाईल विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी एक टीम तयार करत संशयित आरोपी गुलबार याला अटक केली. त्याच्याकडून 3.5 लाख किंमतीचे साहित्य असलेली बॅग जप्त करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT