Arvind Kejriwal dainik gomantak
गोवा

Arvind Kejriwal: मोठी बातमी! गोवा पोलिसांकडून अरविंद केजरीवाल यांना समन्स

Pramod Yadav

गोवा पोलिसांनी आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले आहे. राज्यातील मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याप्रकरणी केजरीवाल यांना 27 एप्रिल रोजी हजर राहण्यासाठी सांगितले आहे.

उत्तर गोव्यातील पेडणे पोलिसांनी हे समन्स बजावले आहे. PTI या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

(Pernem Police issues summons to AAP National Convener Arvind Kejriwal)

पेडणे पोलीसांनी केजरीवाल यांना सीआरपीसी कलम 41 (ए) अंतर्गत नोटीस बजावली आहे.

राज्यातील मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याचे पोलिसांच्या तपासादरम्यान, दिसून आले आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी केजरीवाल यांना समन्स बजावले असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.

पोलिसांनी केजरीवाल यांना 27 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पेडणे पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे.

दरम्यान, मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यांतर्गत गोवा आम आदमी पार्टीचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांना नोटीस बजावल्यानंतर, केजरीवाल यांना देखील पेडणे पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पणजीत मांडवी पुलावर पुन्हा अपघात, तिघेजण जखमी

हॉटेलमध्ये झाली मैत्री, लग्नाचे आमिष देऊन केला लैंगिक अत्याचार; गोव्याच्या तरुणाला छत्तीसगड येथे अटक

Goa Dairy: ..अन्यथा संप पुकारु! थकीत महागाई भत्त्यासोबत इतर मागण्यांवरुन 'गोवा डेअरी’च्या कामगारांचा इशारा

Cutbona Jetty: 'मतदारसंघात आम्हालाच बोलावले जात नाही!' कुटबणबाबत क्रुझ सिल्वांचा हल्लाबोल

Goa BJP: 'पक्ष व सरकार यांच्यात समन्वय पाहिजेच'; गोवा भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची तंबी

SCROLL FOR NEXT