श्री कमळेश्‍‍वर महारुद्र संस्था Dainik Gomantak
गोवा

Pernem : कोरगाव कमळेश्‍‍वर महारुद्र संस्‍थानात महारुद्र स्वाहाकार

२६ एप्रिलपासून तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे : कोरगाव येथील श्री कमळेश्‍‍वर महारुद्र संस्थानचा त्रैवार्षिक महारुद्र स्वाहाकार सोहळा बुधवार दि. २६ एप्रिल ते शुक्रवार दि. २८ एप्रिल या काळात विविध कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे.

यानिमित्त पहिल्‍या दिवशी म्‍हणजे २६ रोजी सकाळी धार्मिक विधी, आरती, तीर्थप्रसाद, सायंकाळी ७ वाजता कोरगाव ग्रामपंचायत पुरस्कृत पार्सेकर मंडळातर्फे (वेंगुर्ला) ‘देवी मळगंगा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्‍यात येणार आहे. दि. २७ रोजी सकाळी धार्मिक विधी, तीर्थप्रसाद तर सायंकाळी ७ वाजता अमृतनाथ दशावतारी नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. दि. २८ रोजी सकाळी धार्मिक विधी,

महाआरती, तीर्थप्रसाद, दुपारी महाप्रसाद, संध्याकाळी ६ वाजता कमळेश्‍‍वर शिक्षण प्रसारक संस्था पुरस्कृत ‘स्वरसंध्या’ हा भक्तिगीत, भावगीतांचा कार्यक्रम होणार आहे. त्‍यात प्रेमानाथ पाळणी, महादेव शेट्ये, रुपेश कुबल, दामोदर शेट्ये, दीपक मेस्त्री, राज पोळजी यांचा सहभाग असेल. सायंकाळी ७ वाजता महापूजा होईल. दरम्‍यान, स्वाहाकार सुरू असताना ओम नमः शिवाय हा जप भक्त जिथे असतील तिथे सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत करावा, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

भूमिका देवस्‍थानात नवचंडी

कोरगाव येथील श्री भूमिका देवस्थानात बुधवार दि. ३ मे रोजी हवनद्वारा नवचंडी कार्यक्रम होणार आहे. त्‍यानिमित्त सकाळी विविध धार्मिक विधी होतील. संध्‍याकाळी ७ वाजता चेंदवणकर दशावतारी नाट्यमंडळाचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. गुरुवार दि. ४ रोजी सकाळी ८ वाजता विविध धार्मिक विधी, आरती, तीर्थप्रसाद, दुपारी महाप्रसाद होणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्‍येने उपस्‍थिती लावावी, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT