Pernem Murder Case Dainik Gomantak
गोवा

Pernem Murder Case: खूनप्रकरणी चार वर्षांनंतर जामीन, पेडणेतील घटना; खटला लांबण्याच्या शक्यतेमुळे आदेश

Pernem murder case bail: पार्से-पेडणे येथील एका डेअरीमध्ये सहकाऱ्याचा खून करून पुरावा नष्ट केल्याचा आरोप असलेल्या अनिल झाटे याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: पार्से-पेडणे येथील एका डेअरीमध्ये सहकाऱ्याचा खून करून पुरावा नष्ट केल्याचा आरोप असलेल्या अनिल झाटे याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. आरोपी गेल्या चार वर्षांहून अधिक काळ कोठडीत असून खटला लवकर संपण्याची शक्यता नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांनी हा आदेश दिला.

३० जानेवारी २०२२ रोजी पेडणे पोलिस स्थानकात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. पार्से येथील एका डेअरीमध्ये काम करणाऱ्या संतोष नामक व्यक्तीचा खून केल्याचा आरोप झाटे याच्यावर आहे. पीडिताचे डोके भिंतीवर तसेच टणक वस्तूवर आपटून त्याची हत्या करण्यात

आली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ४४७, ३०२ आणि २०१ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

एकूण ४४ साक्षीदार

जामिनाला विरोध करताना सरकारी वकिलांनी तांत्रिक पुरावे तसेच आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी न्यायालयासमोर मांडली. मात्र, न्यायालयाने नमूद केले की हा खटला पूर्णतः परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहे. प्रकरणात एकूण ४४ साक्षीदार असून, आतापर्यंत केवळ दोनच साक्षीदारांची साक्ष पूर्ण झाली आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात खटला संपण्याची शक्यता नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: 'काँग्रेस'कडे 2027 साठी नक्की काय प्लॅनिंग आहे? गिरीश चोडणकर 'भाजप'चे तगडे आव्हान कसे पेलणार?

Margao Fish Market: मडगाव 'मासळी मार्केट'ची इमारत बांधून वर्ष उलटलं, पण उद्घाटनाला मुहूर्त मिळेना! व्यापारी आणि मच्छीमार संभ्रमात

Goa Schools Reopening: उन्हाळी सुट्टीनंतर परत वाजली शाळांची घंटा! डिचोलीतील शाळांत 95 टक्क्यांहून अधिक उपस्थिती; नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण

Railway Tender Fraud: रेल्वे निविदेच्या आमिषाने साडेतीन लाखांना 'टोपी', पुण्यातील संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

Cortalim Accident: कोटार्लीत 2 दुचाकींच्‍या अपघातात तिघे जखमी, बुलेटचालकाचा निष्‍काळजीपणा; गुन्हा नोंद

SCROLL FOR NEXT