Crime News Dainik Gomantak
गोवा

Pernem Malpe: चालकाला टॅक्सीतून बाहेर काढले, धारदार शस्त्रांनी केला हल्ला; पेडणे प्रकरणातील तिघे संशयित ताब्यात

Goa Taxi Driver Attack: चोरी करण्याच्या उद्देशाने टॅक्सी चालकावर हल्ला करून पसार गेलेल्या पारधी गॅंगमधील तिघा संशयितांना पेडणे पोलिसांनी संध्याकाळी सावंतवाडी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले.

Sameer Panditrao

पेडणे: मालपे येथे राष्ट्रीय महामार्गावर चोरी करण्याच्या उद्देशाने टॅक्सी चालकावर हल्ला करून पसार गेलेल्या पारधी गॅंगमधील तिघा संशयितांना पेडणे पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी सावंतवाडी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले.

शंकर मधुकर पवार ऊर्फ हाड्या (२४), राजू मधुकर पवार ऊर्फ गुडिया (२३) हे दोघेही सखे भाऊ असून ते सारोळे मोहाल-सोलापूर येथील तर अजय सुनील भोसले (२७) धाणेगाव, तुळजापूर, धाराशिव, महाराष्ट्र अशी संशयितांची नावे आहेत.

१० जुलै रोजी रात्री कळंगुट ते बांद्यापर्यंत भाड्याने टॅक्सी पाहिजे असल्याचा बहाणा करून संजीवन कृष्णा वेंगुर्लेकर यांची टॅक्सी भाड्याने घेतली. रात्री ९ च्या दरम्यान मालपे-न्हईबाग येथील राष्ट्रीय महामार्ग महामार्गावर सामसूम असलेल्या ठिकाणी टॅक्सी थांबवण्यास सांगून संशयितांनी चालक वेंगुर्लेकर याला टॅक्सीतून ओढून बाहेर काढले व धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला करून पसार झाले. या हल्ल्यात वेंगुर्लेकर गंभीर जखमी झाले होते.

दरम्यान, पेडणे पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पेडणे पोलिस शोध घेत सावंतवाडी येथे पोहोचले. मात्र सर्वत्र शोध घेऊनही संशयित सापडू शकले नव्हते.

अल्पवयीन संशयिताकडून मिळालेली अन्य संशयितांची नावे व फोटो पेडणे पोलिसांनी सावंतवाडी पोलिसांना दिले होते. त्यानुसार सावंतवाडी पोलिसांनी शोध घेऊन संशयितांना ताब्यात घेतले व पेडणे पोलिसांच्या हवाली केले. पेडणेचे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT