Jeet Arolkar, Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Pernem: पेडणेतील जमीन रूपांतरणाचा विषय! आमदार जीत-मंत्री राणे आमनेसामने; नगरनियोजन मंत्र्यांनी दावा खोडला

Pernem Land Conversion: पेडणे तालुक्‍यातील जमीन रूपांतरणावरून आमदार जीत आरोलकर आणि नगरनियोजनमंत्री विश्‍‍वजीत राणे पुन्‍हा एकदा आमनेसामने आले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: पेडणे तालुक्‍यातील जमीन रूपांतरणावरून आमदार जीत आरोलकर आणि नगरनियोजनमंत्री विश्‍‍वजीत राणे पुन्‍हा एकदा आमनेसामने आले आहेत.

आत्तापर्यंत पेडण्‍यातील ६० लाख चौरस मीटर जमिनीचे रूपांतरण करण्‍यात आले आहे. असे प्रकार पुढे सुरूच राहिल्‍यास पेडणे नष्‍ट होण्‍याची भीती आमदार आरोलकर यांनी व्‍यक्त केली; तर, आरोलकर यांचा हा दावा चुकीचा असून पेडण्‍यातील केवळ २ लाख ३६ हजार ३६६ चौरस मीटर जमिनीचेच रूपांतरण करण्‍यात आल्‍याचे स्‍पष्‍टीकरण मंत्री राणे यांनी केले आहे. आज बुधवारी जीत आरोलकर यांनी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेत, जमीन रूपांतरण मागे घेण्‍याची मागणी त्‍यांच्‍याकडे केली.

नगरनियोजन मंत्र्यांनी दावा खोडला

पेडणे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जमिनींचे रूपांतरण झाल्यासंदर्भातील आमदार जीत आरोलकर यांचे विधान धक्कादायक आणि वस्तुस्थितीच्या विपरीत आहे.

६० लाख चौरस मीटर जमिनीचे रूपांतरण झाल्याचा आरोलकरांचा दावा पूर्णपणे खोटा आहे.

 नगरनियोजन खात्‍याकडे असलेल्‍या अधिकृत नोंदीनुसार, कलम ३९ ‘अ’ अंतर्गत केवळ २१ प्रकरणे अधिसूचित करण्यात आली आहेत, ज्यात एकूण २,३६,३६६ चौरस मीटर क्षेत्राचा समावेश आहे.

तात्पुरता प्रस्‍ताव म्हणजे जमिनीचे रूपांतरण होत नाही. रूपांतरणाची प्रक्रिया छाननी, आक्षेप आणि अंतिम अधिसूचनेसह कायदेशीर प्रक्रियेनुसार होते.

आरोलकर थेट माझ्‍याशी संपर्क साधू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

BJP Mission 2027: भाजपचे 'मिशन 2027'; जल-जंगल-जमिनीपेक्षा 'मतव्यवस्थापन' ठरणार निर्णायक, उमेदवारांच्या निवडीवरही मोठी नजर

SCROLL FOR NEXT