Kul Mundkar Samiti Goa Dainik Gomantak
गोवा

Pernem: शेतकऱ्यांसाठी घातक असलेला कायदा बदला, कुळ मुंडकार संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kul Mundkar Samiti Goa: पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांनी आणलेला ‘कसेल त्याची जमीन व राहील त्याचे घर’ याबाबत मगो पक्षाची जी भूमिका होती, ती रास्त होती.

गोमंतक ऑनलाईन टीम

पेडणे: पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांनी आणलेला ‘कसेल त्याची जमीन व राहील त्याचे घर’ याबाबत मगो पक्षाची जी भूमिका होती, ती रास्त होती. त्यामुळे अनेकांना आधार वाटत होता. मात्र हा कायदा त्यानंतर आलेल्या सगळ्या सरकारांनी बदलला.

बदललेला कायदा गोव्याच्या जनतेला व शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तो कायदा बदलून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी गोवा कुळ मुंडकार संघर्ष समितीचे समन्वयक दीपेश नाईक यांनी पेडणे येथे केली.

गोव्यातील शेतकऱ्यांचा कसण्याचा दिवस म्हणून ८ ऑक्टोबर हा गोवा कुळ मुंडकार संघर्ष समितीच्या वतीने पाळण्यात येतो. यानिमित्त पेडणे नगरपालिकेच्या महात्मा गांधी उद्यानात आयोजित धरणे आंदोलनात ते बोलत होते. यावेळी हरमलचे माजी सरपंच डॅनियल डिसोझा, संतोष मांद्रेकर व शेतकरी उपस्थित होते

पुढे बोलताना नाईक म्हणाले की ,भाऊसाहेब बांदोडकर आणि आणलेला हा कायदा त्यांची राजवट गेल्यानंतर दुसऱ्या सरकारने बदलला आणि त्यामुळे गोव्यातील कष्टकरी शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत आम्ही वेळोवेळी आवाज उठवत आहोत. ८ ऑक्टोबर या दिवशी ‘कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर’ हा कायदा अंमलात आला तेव्हापासून हा दिवस ‘कसविणाऱ्यांचा दिवस’ म्हणून पाळला जातो.

स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी आणि त्याच्या पक्षाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. मात्र, त्यानंतर आणि खास करून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजप सरकारच्या काळात कायद्यात बदल केले. नवीन बदललेला कायदा हा गोव्याच्या जनतेसाठी आणि गोव्याच्या शेतकऱ्यांसाठी देशोधडीला लावणारा कायदा असून त्यात बदल करणे आवश्यक आहे.

अन्यथा परिणाम भोगावे लागतील!

संतोष मांद्रेकर म्हणाले की भाऊसाहेबांनी कुळ, मुंडकारासाठी जो कायदा केला होता तो त्यानंतरच्या सरकारने बदलून केलेला कुळ आणि मुंडकाराच्या विरोधी कायदा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार नेत्यात बदल करावा, अन्यथा त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: आरक्षित डब्बा न जोडताच धावली कोकण रेल्वे; प्रवाशांना उभं राहून करावा लागला प्रवास

Goa Bus Accident: कदंब बसच्या धडकेत 23 वर्षीय तरुणी ठार, एकजण जखमी, वेर्णा येथे भीषण अपघात; चालकाविरोधात गुन्हा दाखल

Cricketer Threat: 5 कोटी दे...टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला अंडरवर्ल्डकडून धमक्या, दाऊद टोळीचं नाव समोर

Opinion: मायक्रोसॉफ्ट नाही, 'झोहो शो'! केंद्रीय मंत्र्यांनी दिला स्वदेशी सॉफ्टवेअरला 'प्राइम टाइम' बूस्ट

Goa Politics: बाहेरच्या लोकांमुळे 'सुशेगाद' गोव्याची शांतता भंग! गोमंतकीयांना RG-गोवा फॉरवर्डच्या युतीत दिसतोय 'आशेचा किरण'

SCROLL FOR NEXT