Kargil Vijay Diwas Dainik Gomantak
गोवा

Kargil Vijay Diwas : वीर जवानांच्या त्यागाचे सदैव स्मरण ठेवा : हेमंत मांद्रेकर

Kargil Vijay Diwas :भगवती हायस्कूलमध्ये कारगिल विजय दिवस साजरा

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे, श्री भगवती हायस्कूल पेडणे येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय लष्कराचे निवृत्त हवालदार हेमंत मांद्रेकर उपस्थित होते.

तसेच मुख्याध्यापक राघोबा कांबळी, ज्येष्ठ शिक्षिका ललिता नाईक, सुनीलदत्त गवस, कार्यक्रम प्रमुख मनोजा सावंत, प्राथमिक विभागाच्या लीना वाझ आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

पाहुण्यांच्या हस्ते समई प्रज्वलित करण्यात आली. मांद्रेकर यांनी कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा दिला. वीर जवानांची समर्पित भावना व देशासाठी त्यांनी केलेला त्याग याचे सदैव स्मरण ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्याध्यापक राघोबा कांबळी यांनी प्रास्ताविक केले. ललिता नाईक यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन नवल नारोजी यांनी केले. आभार प्रदर्शन सुनीलदत्त गवस यांनी मानले.

मांद्रेकर यांचा सत्कार

भारतीय सैन्यात दिलेल्या योगदानाबाबत यावेळी निवृत्त हवालदार हेमंत मांद्रेकर यांचा शाळेतर्फे शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT