Mopa Parking Rate  Dainik Gomantak
गोवा

Mopa Parking Rate : मोपावर पार्किंगच्या दरात वाढ; टॅक्सीचालकांत संताप

Mopa Parking Rate : दरवाढ मागे घेण्याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa Parking Rate :

पेडणे, मोपा विमानतळ चालविण्याचे कंत्राट दिलेल्या जीएमआर कंपनीने टॅक्सी पार्किंगच्या दरात वाढ केल्याने टॅक्सीचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एकीकडे सरकारने कोट्यवधी रुपयांचा महसूल भरण्यात सूट दिलेली असताना जीएमआर कंपनीने टॅक्सी पार्किंगच्या दरात मोठी वाढ केल्याने पेडणे परिसरातील टॅक्सीचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी टॅक्सी व्यावसायिकांनी केली आहे.

टॅक्सी व्यावसायिकांना टॅक्सी पार्किंगसाठी जो ५० रुपये दर होता, तो वाढवून तब्बल २०० रुपये करण्यात आला आहे. तसा फलक जीएमआर कंपनीने मोपा विमानतळ परिसरातील पार्किंग जागेत लावला आहे. ही नवी दर आकारणी १ जुलैपासून अंमलात येणार असल्याचे या फलकावर दर्शविण्यात आले आहे. यामुळे टॅक्सी व्यवसाय करणाऱ्या स्थानिक टॅक्सीधारकांमध्ये संताप आणि नाराजीचे वातावरण पसरले आहे.

मोपा विमानतळासाठी जमीन गेलेल्यांचा आणि पेडणे तालुक्याला कसलाही फायदा झालेला नाही. गोवा सरकारचे जीएमआर कंपनीवर अजिबात नियंत्रण नाही. या कंपनीचे सरकार लाड करत आहे.

विमानतळाच्या महसुलाद्वारे मिळणारी कमाई या कंपनीला मिळत असताना कंपनीने टॅक्सी पार्किंग दरवाढ करून टॅक्सी व्यावसायिकांना संकटात टाकले आहे, असे ग्रीन फील्ड मोपा टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष उदय महाले यांनी सांगितले.

दरवाढ अन्यायकारक

ग्रीन फील्ड मोपा टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष उदय महाले म्हणाले, की टॅक्सी पार्किंगच्या दरात वाढ करून टॅक्सी व्यावसायिकांसमोर जीएमआर कंपनीने मोठी समस्या निर्माण केली आहे. जर अर्ध्या तासात टॅक्सीचालकाला एकही भाडे मिळाले नाही, तर विनाकारण २०० रुपये पार्किंग दर द्यावा लागणार आहे, हे अन्यायकारक आहे. त्यामुळे ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vande Bharat Express: 'वंदे भारत' एक्सप्रेस कोझिकोडपर्यंत हवी, खासदार सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेत मागणी

Yashasvi Jaiswal Hospitalized: यशस्वी जयस्वालची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल

Goa University Election: विद्यापीठ निवडणूक अचानक रद्द, 15 मिनिटे आधी पत्रक; अभाविप ,एनएसयूआयकडून धरणे आंदोलन

Horoscope: बुधवारी तुमच्या राशीत काय? मेष-मिथुनला पार्टनरकडून खास भेट, कर्कचे जुने टेन्शन दूर होणार

Goa Assembly Winter Session 2026: विधानसभेचे हिवाळी अधिवेशन हडफडे अग्निकांडामुळे तापणार? 12 ते 16 जानेवारीपर्यंत चालणार कामकाज

SCROLL FOR NEXT