Goa HSSC Result 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa HSSC Result 2023: पेडणे शासकीय उच्च माध्यमिकची यशाची परंपरा कायम, बारावीचा 92.27 टक्के निकाल

कला 98.11, वाणिज्य 98.24, विज्ञान शाखा 93.33 टक्के

गोमन्तक डिजिटल टीम

Goa HSSC Result 2023 पेडणे येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाचा 12 वीच्या वार्षिक परीक्षेचा निकाल 92.27 टक्के इतका लागून विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे.

कला शाखेचा 98.11 टक्के, वाणिज्य 98.24 टक्के आणि विज्ञान 93.33 टक्के तर व्यावसायिक शाखेचा निकाल 84.62 टक्के इतका लागला आहे.

कला शाखेत सेजल गडेकर (90 टक्के ) ही विद्यालयात प्रथम,तर साक्षी पंडित ही 78.3 टक्के गुणांसह दुसरी तर वैदही कोटकर ही 78 टक्के गुण मिळवून कला शाखेत तिसरी आली.

वाणिज्य रश्मी साळगावकर (94 टक्के) गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली. कु. समीक्षा भगत ही ९२ टक्के गुण प्राप्त करून विद्यालयात दुसरी तर रिया राऊळ 91टक्के गुण प्राप्त करून वाणिज्य विभागात विद्यालयात तिसरी आली.

विज्ञान विभागात प्रतिमा सुरेंद्र सिंग ही विद्यार्थिनी ७९.३३ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली. आत्माराम दिगंबर महाले हा विद्यार्थी ७३.८३ टक्के गुण प्राप्त करून दुसरा आला. वृषाली विनोद कुडतरकर ही विद्यार्थिनी ७३.१६ टक्के गुण मिळवून विद्यालयात तिसरी आली.

सर्व विद्यार्थ्यांचे पेडणे परिसरात कौतुक होत असून विद्यालयाच्या प्राचार्य आशा नाईक व उपप्राचार्य कीर्तिमाला परब यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

एफडीएम मध्ये अर्पिता प्रथम

अर्पिता अशोक बळी ही विद्यार्थिनी ८० टक्के गुण मिळवून एफडीएम या व्यावसायिक विभागात विद्यालयामध्ये प्रथम आली. दीक्षा पेडणेकर ही विद्यार्थिनी ७५ टक्के गुण मिळवून विद्यालयात दुसरी आली. तर संध्या माने ही विद्यार्थिनी ७३ टक्के गुण मिळवून विद्यालयात एफडीएम या विभागात तिसरी आली.

ऑफिस मॅनेजमंेट मध्ये दीक्षा प्रथम

ऑफिस मॅनेजमेंट विभागात दीक्षा महाले ही ७७ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली. अनिल परब हा विद्यार्थी ७६ टक्के गुण मिळवून विद्यालयात दुसरा तर शंकर तळवणेकर हा विद्यार्थी ७५ टक्के गुण मिळवून या विभागात विद्यालयात तिसरा आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ST Reservation: गोवा विधानसभेत 'एसटी' आरक्षणाचा मार्ग मोकळा! गावडा, कुणबी अन् वेळीप समाजाला मिळणार हक्काचे राजकीय प्रतिनिधित्व; अंमलबजावणीस प्रारंभ

Mohan Bhagwat Speech: "जेन-झी ही प्रामाणिक पिढी; माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास!" 'आयआयएमयूएन'च्या परिषदेत सरसंघचालकांचे यांचे मोठे वक्तव्य

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT