Pernem Farmer Dainik Gomantak
गोवा

Pernem Farmer: पशू-पक्षी शेती नष्ट करताहेत; तोडगा काढा! शेतकऱ्यांची सूचना

गोमन्तक डिजिटल टीम

https://www.dainikgomantak.com/goaPernem Farmer : पेडणे, कृषी धोरणावर चर्चा तसेच सूचना करण्यासाठी पेडणे येथील विभागीय कृषी कार्यालयात तालुक्यातील शेतकरी , शेतकरी संस्था,लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या संयुक्त बैठकीत आज शेतकऱ्यांनी महत्त्वपूर्ण अशा सूचना केल्या.

बहुतांश विकास प्रकल्पांमुळे झाडे, डोंगर नष्ट झाल्याने पशू-पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवासही नष्ट झाल्याने ते शेती-बागायती नष्ट करत आहेत. यावर सरकारने तोडगा काढावा,अशी सूचना करण्यात आली.

या बैठकीला अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात शेतकरी आल्याने या सभागृहात आलेले शेतकरी सामावू न शकल्याने काही वेळ गोंधळ उडाला व ही बैठक पेडणे शेतकरी सभागृहात घेण्यात आली.

व्यासपीठावर पेडणे कृषी अधिकारी प्रकाश राऊत ,उपकृषीअधिकारी धीरज परब,मांद्रेचे सरपंच ॲड. अमित सावंत ,किरण शिरोडकर व पेड्णे शेतकरी सोसायटीचे संचालक शांबा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाला पेडणे व मांद्रेचे दोन्ही आमदार उपस्थित राहिले नाहीत. या कार्यक्रमाचे पेडणे व मांद्रे अशा दोन ठिकाणी आयोजन करून दोन्ही आमदारांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन व्हावे.त्यासाठी दोन्ही मतदारसंघात सभागृहही मोफत उपलब्ध करून देऊ.

-ॲड.अमित सावंत, सरपंच मांद्रे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kadamba Transport: कदंब बससाठी गोव्यात चालक मिळेनात? कर्नाटकात झळकली जाहीरात

Yuri Alemao: भाजप सरकार अपयशी! गोव्याला दलाल संस्कृती, गुन्ह्यांचे केंद्र बनवले; आलेमाव यांचा घणाघात

Shah Rukh Khan: अखेर भेट झालीच नाही... किंग खानवर कोसळला दु:खाचा डोंगर, मार्गदर्शक शिक्षकाचे गोव्यात निधन

Sonsodo News: सोनसडा येथील कचरा समस्‍या संपली! मडगाव नगराध्‍यक्ष शिरोडकरांचा दावा

खरी कुजबुज: युरींचे कुडतरीवर लक्ष?

SCROLL FOR NEXT