Pernem  Dainik Gomantak
गोवा

Pernem News : सरकारी अनास्थेमुळे ‘मोपा’साठी जमिनी गेल्या, रोजगारही मिळेना! ॲड. रमाकांत खलप

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem News :

पेडणे, मोपा पठारावर बॉक्साईट खाण सुरू केली, तर सर्व उद्ध्वस्त होईल या भीतीने त्याला आम्ही प्रखरपणे विरोध केला. मोपा विमानतळ व आयुष इस्पितळात युवकांना रोजगार मिळणार, अशी आशा होती.

पण भाजप सरकारच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आणि युवकांना नोकऱ्याही मिळल्या नाहीत. मात्र परराज्यातील लोकांना नोकऱ्या मिळाल्या, अशी जोरदार टीका कॉंग्रेसचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी केली.

नागझर येथे नाना शेट सभागृहात मंगळवारी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार कार्लुस फेरेरा, डॉ. प्रमोद साळगावकर, बीना नाईक, माजी मंत्री ॲड. चंद्रकांत चोडणकर, राजन घाटे ,गोवा फॉरवर्डचे दीपक कळंगुटकर, ‘आप’चे पुंडलिक धारगळकर, मिलाग्रिना फर्नांडिस, कृष्णा नाईक, शिवसेनेचे सुभाष केरकर, प्रणव परब उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पाटकर म्हणाले की, विद्यमान खासदारांनी या गावच्या विकासासाठी इब्रामपूर दत्तक घेतले होते, परंतु ते सपशेल अपयशी ठरले आहेत. या गावात कोणताही विकास होत नाही, तसेच जमिनीचे ना हरकत दाखले उपलब्ध होत नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. पण मोपा विमानतळासाठी या सरकारने शेतकऱ्यांकडून जमीन हडप केली, तेव्हा जमीन कशी मिळाली, असा प्रश्न त्यांनी केला.

हळदोणेचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा म्हणाले की, रमाकांत खलप हे खरे सिंह आहेत, तुमचा आवाज ते लोकसभेत पोहोचवतील.

अंडरपास नसल्याने अनेक बळी

खलप म्हणाले, चार पदरी महामार्गावर आवश्यक ठिकाणी उड्डाण पूल ,अंडर पास न ठेवल्याने कित्येक बळी जात आहेत.

महामार्गावरून प्रवास करताना कंबरडे मोडते. मी निवडून आल्यास विमानतळ चालवणाऱ्या कंपनीस स्थानिकांना नोकऱ्या देण्यास भाग पाडेन. महामार्गात सुधारणा घडवून आणेन. पेडणे तालुक्याशी माझे जवळचे संबंध असून पेडणे माझ्या हृदयात आहे, असेही खलप यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT