Goa Destination Wedding Dainik Gomantak
गोवा

Goa Destination Wedding: गोव्यात हंगाम ठरतोय फायदेशीर; पर्यटनात आर्थिक उलाढाल समाधानकारक

Goa Destination Wedding: कोरोनाचा संसर्ग न होता हा हंगाम पुढेही सुरळीत झाला तर गेल्या दोन वर्षांचा आर्थिक तोटा भरून होईल.

दैनिक गोमन्तक

Goa Destination Wedding: पेडणे तालुक्यातील मोरजी, आश्वे-मांद्रे आणि हरमल व केरी-तेरेखोल या किनारी भागात पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे. हा हंगाम जर पूर्णपणे एप्रिलपर्यंत सुरळीत चालला तर मागच्या दोन वर्षांतील नुकसान भरून येणार असल्याची माहिती व्यावसायिक देत आहेत.

पर्यटन हंगाम म्हटल्यानंतर किनारी भागात किमान 5,000 पेक्षा जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे पर्यटनाचा व्यवसाय वाढीस लावण्यासाठी विविध आस्थापने त्यात भाजी, बेकरी, दूध, मासे, सुपर मार्केट, मनी एक्स्चेंज, टेलिफोन, प्रवासी वाहने, कपडे अशा विविध व्यावसायिकांना या पर्यटन हंगामाचा लाभ होत असतो.

पर्यटन हंगाम म्हटला की संगीत रजनी, पार्ट्या, ध्वनिप्रदूषण, चोऱ्या-माऱ्या असे प्रकार वारंवार घडतात. एखादी संगीत रजनी पार्टी आयोजित केली तर अनेकांची मर्जी राखावी लागते. मग परवाना असो किंवा नसो.

मांद्रे मतदारसंघातील काही रेस्टॉरंट आता देशी आणि विदेशी पर्यटकांचे लग्नसोहळे आयोजित करण्यावर भर देत आहेत. किनारी भागातील मोजक्याच हॉटेल्सवर असे सोहळे आयोजित केले जातात. आज-काल टॅक्सी व्यावसायिक जे पर्यटक घेऊन हॉटेलवर येतात त्यांनाही एखाद्यावेळी गिफ्ट ऑफर दिली तर ते दुसऱ्या वेळी ग्राहक आणतात.

आवश्‍यक सुविधांची वानवा

विदेशातील उच्च दर्जाचे पर्यटक यायला हवे तर तशा सुविधा राज्यात आणि किनारी भागात उपलब्ध व्हायला हव्यात. येणाऱ्या पर्यटकांना किनारी भागात आवश्‍यक सोयीसुविधा पुरवल्या जात नाहीत.

असा असतो लग्नसोहळ्यांचा थाट...

  • सर्व नियम पाळून किनारी भागात लग्न सोहळे.

  • केवळ नातेवाईक व निमंत्रित पाहुण्यांची उपस्थिती.

  • किनारी भागातील आकर्षक रेस्टॉरंटमध्ये आयोजन.

  • लग्नसोहळ्यात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई.

  • सायंकाळी सूर्यास्तानंतर शांत वातावरणात कार्यक्रम.

  • भारतीय संगीताच्या मैफली. जेवणाची सोय.

हरी म्हामल, ‘लाकबाना रिसॉर्ट’चे व्यवस्थापक-

यंदा किनारी भागातील पर्यटन हंगाम फायदेशीर आहे. कोरोनाचा संसर्ग न होता हा हंगाम पुढेही सुरळीत झाला तर गेल्या दोन वर्षांचा आर्थिक तोटा भरून होईल.

प्रमेश मयेकर, व्यावसायिक-

यंदा मोठ्या प्रमाणात देशी आणि विदेशी पर्यटक किनारी भागाबरोबरच ग्रामीण भागात वास्तव्य करत आहेत. यंदा पर्यटनात ज्यांनी आर्थिक गुंतवणूक केली त्यांना लाभ होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, अशी प्रार्थना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT