Rajan Korgaonkar Dainik Gomantak
गोवा

Rajan Korgaonkar: पेडण्यात नव्या राजकीय समीकरणांना आली गती, राजन कोरगावकर यांच्या उमेदवारीला बळ

Rajan Korgaonkar Pernem Assembly Election: आगामी विधानसभा निवडणुकीत पेडणे मतदारसंघातून राजन कोरगावकर हेच आमदार म्हणून निवडून येतील, असा ठाम विश्वास माजी आमदार प्रवीण झांट्ये आणि माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी व्यक्त केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

मोरजी: आगामी विधानसभा निवडणुकीत पेडणे मतदारसंघातून राजन कोरगावकर हेच आमदार म्हणून निवडून येतील, असा ठाम विश्वास माजी आमदार प्रवीण झांट्ये आणि माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी व्यक्त केला. कोरगाव टोमलीन गार्डन येथे आयोजित वाढदिवस सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने समर्थक उपस्थित राहिल्याने राजकीय शक्तिप्रदर्शनाचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमात पत्रकार किशोर नाईक गावकर, सुदीप ताम्हाणकर, रश्मी कोरगावकर, राजू नरसे आणि गजानन गडेकर यांसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थिती पाहून माजी आमदार आणि माजी मंत्रीही अचंबित झाले.

माजी आमदार झांट्ये यांनी सांगितले की, कोरगावकरांच्या प्रत्येक उपक्रमाला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत असून, त्यांचा जनाधार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित अाहे. पत्रकार किशोर नाईक गावकर यांनी पेडणेतील स्थानिक भूमिपुत्रांना प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले.

सुदीप ताम्हाणकर यांनी मोपा विमानतळाशी संबंधित टॅक्सी व्यावसायिकांच्या प्रश्नांवर कोरगावकर यांनी सातत्याने आवाज उठवल्याचे सांगितले. स्थानिक मुद्यांवरील सक्रिय भूमिकेमुळेच त्यांचा जनाधार मजबूत होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राज्यातील 54 समुद्रकिनाऱ्यांवर 450 हून अधिक प्रशिक्षित जीवरक्षक, बीच मार्शल तैनात

VIDEO: घरात शिरला चक्क 16 फुटी किंग कोब्रा! असोडे-सत्तरी येथे घरात शिरलेल्या महाकाय सापाला प्राणिमित्राकडून जीवदान

Chicken Shop Health Card: राज्यातील चिकन दुकानांतील कर्मचाऱ्यांना 'आरोग्य कार्ड', मडगावातून सोमवारपासून मोहिमेस प्रारंभ

भाजप प्रदेशाध्यक्षांकडूनच वीज खात्याला कानपिचक्या; कारभारावर ताशेरे,जनजागृती न केल्याचा ठपका

कर्मचाऱ्यांचे 'अच्छे दिन'! मनुष्यबळ विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार आता सहाव्या वेतन आयोगाच्या समकक्ष

SCROLL FOR NEXT