Goa Sand Extraction Dainik Gomantak
गोवा

Sand Mining: गोव्यात रेतीचा तुटवडा! पर्यावरण दाखल्यांमुळे परवान्यांना विलंब; बांधकाम उद्योगावर नकारात्मक परिणाम

Sand mining in Mandovi and Zuari rivers: राज्यातील मांडवी व झुआरी नदीतून रेती काढण्यास परवाने देण्यासाठी पर्यावरण दाखल्यांचा अडसर निर्माण झाला आहे. गेले १५ दिवस राज्य पर्यावरण आघात मूल्यांकन समितीची बैठकच न झाल्याने पर्यावरण दाखले मिळणे लांबणीवर पडले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Environmental clearance delay for sand mining in Mandovi and Zuari rivers

पणजी: राज्यातील मांडवी व झुआरी नदीतून रेती काढण्यास परवाने देण्यासाठी पर्यावरण दाखल्यांचा अडसर निर्माण झाला आहे. गेले १५ दिवस राज्य पर्यावरण आघात मूल्यांकन समितीची बैठकच न झाल्याने पर्यावरण दाखले मिळणे लांबणीवर पडले आहेत.

रेती उत्खननासाठी आवश्यक असलेल्या परवान्यांमध्ये अडथळा निर्माण झाला असून त्यामागे पर्यावरण दाखल्यांचा विलंब हा प्रमुख मुद्दा आहे. पर्यावरण मंत्रालयाच्या नियमांनुसार, रेती उत्खननासाठी पर्यावरणीय मंजुरी मिळवणे बंधनकारक आहे. मात्र, ही प्रक्रिया वेळखाऊ व जटिल आहे. अनेकवेळा अर्ज प्रक्रियेत विसंगती, संबंधित विभागांकडून वेळेत फाईल तपासणी न होणे व मंजुरी प्रक्रियेसाठी तांत्रिक तपासणीमध्ये होणारा विलंब यामुळे परवाने वेळेत मिळत नाहीत. आता तर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा नियोजन आराखड्यात उत्तर गोव्यातील क्षेत्रे समाविष्ट केली गेल्याने समितीने पर्यावरण दाखल्यांसाठीचे अर्ज विचारात घेतले नव्हते.

बांधकामांवर परिणाम

आता नव्याने दुरुस्त केलेले आराखडे सादर केले आहेत. त्यानंतर समितीची बैठकच झालेली नाही. रेतीसाठी शेजारील राज्यांवर अवलंबून राहण्याची वेळ आल्याने राज्यात रेतीचा तुटवडा जाणवतो आहे. परिणामी, बांधकाम उद्योगावर नकारात्मक परिणाम होतो आहे. अनेक छोटे आणि मध्यम उद्योग, जे बांधकाम क्षेत्रावर अवलंबून आहेत, त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शिवाय, बेकायदेशीर उत्खननाला चालना मिळत असल्याचेही निरीक्षण नोंदवले गेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Seattle Center Shooting: अमेरिकेतील सिएटलमध्ये फूड फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार; दोन ठार, पाच जण जखमी Watch Video

Salcete No Development Zone: सासष्टीतील 1.02 कोटी चौमी जमीन 'ना विकास क्षेत्र' करण्याचा प्रस्ताव! 5 गावांचा समावेश, ३० दिवसांच्या आत सूचना व हरकती मागविण्यात आल्या

Goa Development Projects: 'पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनामुळेच गोव्याचा विकास!' सड्या येथे इस्पितळाच्या भूमिपूजनाप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

Job Scam: 18 वर्षीय तरुणाला नोकरीचं आमिष दाखवत निर्जनस्थळी नेलं अन्... धक्कादायक प्रकरण समोर, एक आरोपी अटकेत; दुसऱ्याचा शोध सुरू

Goa Cow Lovers Protest: गोवंशावर अन्‍याय करणाऱ्यांना तातडीने अटक करा; 12 दिवसांत गुरे सुरक्षितस्‍थळी हलवा; केपे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे गोप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT