Pepper Farming on the Rise in Goa
गंगाराम आवणे
पणजी: राज्यात भात शेती, काजूची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच बागायती पिकेही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. अनेक कुटुंबे बागायती पिकावर आपल्या कुटुंबाचा गाडा हाकतात. बागायती पिकात नारळ, पोफळी, केळी, कोकम, मिरी आदींचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांत मिरी लागवडीत मोठी वाढ झाली आहे.
मिरी पीक हे किफायती व कमी श्रमात उत्पादन देणारे पीक आहे. वेलीवर उगवणारे हे पीक आहे. कोणत्याही झाडाच्या मुळात ही मीरवेल लावून पीक घेता येता.
विशेषत: बागायतीतील अन्य झाडांवर हे पीक घेता येते. नारळ, पोफळी आदी झाडांवर मीरवेलीची लागवड केली जाते. तसेच बागायतीतील आंबा, काजू आदी झाडांवरही मीरवेल चांगले पीक देते.
राज्यात सध्या ८६८ हेक्टर क्षेत्रफळावर मीरवेलीची लागवड करण्यात आली असून यंदा एकूण ३५० टन उत्पादन घेण्यात आले. यंदा मिरवेल लागवड क्षेत्रफळात ७ हेक्टरने वाढ झाली आहे. उत्तर गोव्यात १ हेक्टरने मिरी लागवडीत वाढ झाली आहे. दक्षिण गोव्यात ६ हेक्टरने मिरी लागवडीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी राज्यात एकूण ८६१ हेक्टर क्षेत्रफळ लागवडी खाली होते.
राज्यात मिरी लागवड क्षेत्रफळात ७ हेक्टरने वाढ झाली असली तरी उत्तर गोव्यातील बार्देश तसेच दक्षिण गोव्यातील धारबांदोडा आणि सासष्टी तालुक्यातील मिरीवेल लागवड क्षेत्रफळात प्रत्येकी एका हेक्टरने घट झाली आहे. तिसवाडी, डिचोली, काणकोण, केपे तालुक्यात प्रत्येकी १ हेक्टरने मिरीवेल लागवडीत वाढ झाली आहे.
फोंड्यात ४ हेक्टरने मिरवेल लागवडीत वाढ झाली आहे. राज्यातील सर्वाधिक मिरी लागवड व उत्पादन फोंडा तालुक्यात घेतले जाते. फोंड्यात सर्वाधिक २११ हेक्टर क्षेत्रफळ लागवडीखाली असून यंदा एकूण १०० टन मिरीचे उत्पादन घेण्यात आले. तिसवाडी तालुक्यात सर्वात कमी ३ हेक्टर क्षेत्रफळ मिरवेल लागवडीखाली आहे. सर्वात कमी उत्पादन तिसवाडी व मुरगाव तालुक्यात प्रत्येकी २ टन आहे.
लागवडीखालील क्षेत्रफळ : ८६८ हेक्टर
उत्पादन : ३५० टन
उत्तर गोवा
क्षेत्रफळ : ३०१ हेक्टर
उत्पादन : ११४ टन
दक्षिण गोवा
क्षेत्रफळ : ५६७ हेक्टर
उत्पादन : २३६ टन
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.