Dengue Dainik Gomantak
गोवा

Dengue News : डेंग्यू निर्मूलनासाठी लोकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे : आरोग्य उपसंचालक डॉ.कल्पना महात्मे

गोमन्तक डिजिटल टीम

Dengue News :

सासष्टी, डेंग्यू हा विषाणूजन्य रोग असून तो डासांपासून फैलावतो. या रोगाचा फैलाव पावसाळ्यात जास्त प्रमाणात होतो. डेंग्यू निर्मूलनासाठी आरोग्य खात्याकडून सर्व प्रकारची दक्षता घेतली जाते. वेगवेगळे उपाय योजिले जातात.

पण सर्व थरातील लोकांचे सहकार्यही अंत्यंत महत्वाचे आहे,असे आरोग्य खात्याच्या उपसंचालक डॉ. कल्पना महात्मे यांनी मडगावात राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितले.

लोकांमध्ये जागृति करण्यासाठी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. डेंग्यू रोगाचा प्रसार कसा होत असतो, त्यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय योजिले जातात व लोकांनी सहकार्य कसे करावे या बद्दलचे मार्गदर्शन त्यानी यावेळी उपस्थितांना केले.

यंदाच्या राष्ट्रीय डेंग्यू दिनाची संकल्पना आहे ‘कनेक्ट विथ द कम्युनिटी टू कंट्रोल डेंग्यू’ असे सांगून त्या म्हणाल्या की पंचायत, नगरपालिका सारख्या स्थानिक संस्थांना याबद्दलचे मार्गदर्शन दिले जाते. शिवाय त्यांच्या मध्ये जागृति केली जाते. आरोग्य खात्यामार्फत त्यांना सर्वतोपरी मदत केली जाते. त्याच बरोबर लोकांचेही सहकार्य तेवढेच आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.

आरोग्य खात्यामार्फत शाळांनी, सरकारी खात्यांमध्ये, औद्योगिक वसाहतीत, बांधकामांच्या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांतर्फे डेंग्यू निर्मुलनासाठी उपाय योजना केली जाते. आरोग्य खात्याकडे कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने लोकांचे सहकार्य अपेक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रत्येकाने आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, निरोपयोगी वस्तू साठवून ठेवू नयेत, डांसाची पैदास होऊ नये या साठी उपाय योजणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या सभागृहात खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वेगवेगळ्या स्पर्धाही आयोजित केल्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिलिंद देसाई, सन्माननीय अतिथी म्हणून जिल्हा इस्पितळाचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर, डॉ. धोंड व डॉ. बाप्तिस्त उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT